UPSC CSE 2024 मध्ये जळगावचा झेंडा फडकवणारा – योगेश पाटील!
चि. योगेश ललित पाटील (रा. आमोदे, ता. यावल, जि. जळगाव) याने UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये All India Rank – 811 पटकावून संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे! 🇮🇳✨🙏 साधं घर, मोठं स्वप्न आणि …

चि. योगेश ललित पाटील (रा. आमोदे, ता. यावल, जि. जळगाव) याने UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये All India Rank – 811 पटकावून संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे! 🇮🇳✨
🙏 साधं घर, मोठं स्वप्न आणि अपार मेहनत — वडील लहानसे दुकान चालवणारे, आई गृहिणी; कोणतीही कोचिंग क्लासेसची मदत नाही, तरीही योगेशने केवळ स्व-अभ्यासाच्या जोरावर हे मोठं यश मिळवलं आहे.
📘 UPSC सारख्या कठीण परीक्षेत ग्रामीण भागातून, अत्यंत साधनसंपन्नतेशिवाय मिळवलेली ही घवघवीत कामगिरी नव्या पिढीसाठी निश्चितच दीपस्तंभ ठरणारी आहे.
🎓 योगेशच्या यशाबद्दल जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी विशेष सत्कार केला. त्यांना प्रेरणादायी पुस्तके भेट देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
💬 “चिकाटी, सातत्य, आत्मशक्ती आणि दृढ इच्छाशक्ती असली, तर कोणतीही पार्श्वभूमी आड येत नाही, हे योगेशने सिद्ध केलं आहे,” असं मत जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलं.
🌱 त्याच्या या यशामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक तरुणांना नवी प्रेरणा मिळाली आहे. "स्वप्न बघा आणि झपाटून त्यासाठी लढा," हेच या यशामागचं संदेश आहे.
👏 पंचक्रोशी न्यूज परिवारातर्फे योगेशला मनःपूर्वक शुभेच्छा आणि उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
संबंधित बातम्या

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
उद्या साजऱ्या होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण असून मंडळे, बाजारपेठा आणि घरगुती गणेशभक्तांकडून अंतिम तयारीला वेग आला आहे.

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..
महाराष्ट्रात सध्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR – Special Summary Revision) प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पडताळणी केली जात आहे.…

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २५ वर्षीय विजय राठोड हा तरुण मध्यरात्रीपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.…

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष? गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव
भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींना पंचायत समिती स्तरावर दखल न मिळाल्याने अखेर नागरिकाने थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…