रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

पंचक्रोशी न्यूजवरसाडे पंचक्रोशीतील बातम्या · राज्य व राष्ट्रीय घडामोडी
ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर.. धरणात पाण्याची कमतरता.. भविष्यात पाणीटंचाईची भितीMPSC आंदोलनाची व्यापी वाढली. अनेक विरोधी नेत्यांची आंदोलनाला भेटदुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा
जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा

वरसाडे तांडा येथील शेतकरी कैलास प्रधान राठोड यांनी आज (शुक्रवार) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे वरसाडे तांडा परिसरात शोककळा पसरली असून गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादक१३ नोव्हेंबर, २०२६ रोजी ११:०२ PM वाजता
शेतकरी कैलास प्रधान राठोड
शेतकरी कैलास प्रधान राठोड

वरसाडे तांडा, ता. पाचोरा, जि. जळगाव | शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६

वरसाडे तांडा येथील शेतकरी कैलास प्रधान राठोड यांनी आज (शुक्रवार) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे वरसाडे तांडा परिसरात शोककळा पसरली असून गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दुष्काळ, शेतीतील नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे कैलास राठोड आर्थिक संकटाचा सामना करत होते. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने आणि आर्थिक अडचणी वाढत असल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र आत्महत्येमागील अजुन नेमके कारण अधिकृतरीत्या स्पष्ट होणे बाकी आहे.

घटनेनंतर पुढील कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रियेसाठी मृतदेह शासकीय रुग्णालय, पाचोरा येथे पाठवण्यात आला आहे.

या घटनेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा आणि शेतीसमोरील गंभीर संकटांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या आयुष्यातील आर्थिक अस्थिरता, नापिकी आणि कर्जाचा प्रश्न केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून त्यामागे अनेक कुटुंबांचे आयुष्य गुंतलेले आहे.

जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या

वरसाडे तांडा येथे विशेष शिबीर  ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानाअंतर्गत रेशनकार्ड, मतदानकार्ड, नाव दुरुस्ती तसेच विविध योजनांचा नागरिकांना घेतला लाभ..
वरसाडे प्र पा६ ऑक्टोबर, २०२६ रोजी ३:४२ PM वाजता

वरसाडे तांडा येथे विशेष शिबीर ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानाअंतर्गत रेशनकार्ड, मतदानकार्ड, नाव दुरुस्ती तसेच विविध योजनांचा नागरिकांना घेतला लाभ..

तहसील प्रशासन, स्थानिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे नागरिकांची शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी झाली असून, नागरिकांनी शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले व शिबीर गावात आणल्याबद्दल माजी. जि.प सदस्य मधुभाऊ काटे व अमोल राठोड यांचे गावकऱ्यांनी कौतुक केले.

वरसाडे गावाचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात; मुतारी–गटारींची भीषण अवस्था, डासांचा उपद्रव वाढला
वरसाडे प्र पा२३ नोव्हेंबर, २०२५ रोजी ९:३७ PM वाजता

वरसाडे गावाचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात; मुतारी–गटारींची भीषण अवस्था, डासांचा उपद्रव वाढला

वरसाडे (ता. पाचोरा ) – गावातील नागरीकांचे आरोग्य गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड धोक्यात आले असून स्थानिक मुतारी आणि गटारींची दयनीय अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.…

जि.प. शाळा वरसाडे तांडा ( वरसाडे प्र पा ) नव्या रंगात झळकली; भिंतींवरील चित्र व सुविचारांनी परिसर उजळला...
वरसाडे प्र पा८ नोव्हेंबर, २०२५ रोजी २:०० PM वाजता

जि.प. शाळा वरसाडे तांडा ( वरसाडे प्र पा ) नव्या रंगात झळकली; भिंतींवरील चित्र व सुविचारांनी परिसर उजळला...

वरसाडे प्र पा, पाचोरा (जळगाव)वरसाडे तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता नव्या रूपात खुलून दिसत आहे. शाळेची व कंपाऊंड भिंतीची पूर्वी जी अवस्था होती ती आता पूर्ण बदलली आहे.…

कसळाबाई शंकर पवार प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा येथे पार पडला शिक्षक-पालक मेळावा..
वरसाडे प्र पा३० सप्टेंबर, २०२५ रोजी १:०६ PM वाजता

कसळाबाई शंकर पवार प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा येथे पार पडला शिक्षक-पालक मेळावा..

वरसाडे तांडा (पाचोरा) येथील आश्रम शाळेत दि.30 सप्टेंबर रोजी मंगळवारी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच शिस्त, स्वच्छता, उपस्थिती आणि गुणवत्ता…

जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा