पिंपळगाव हरेश्वर येथे भटके-विमुक्तांसाठी विशेष शिबिर उत्साहात संपन्न
पिंपळगाव हरेश्वर येथे आयोजित विशेष शिबिराचा पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. शिबिरामुळे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा व सुविधांचा फायदा झाला. अशा प्रकारची शिबिरे अधूनमधून आयोजित करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली. कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती होती.

पिंपळगाव हरेश्वर : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियाना अंतर्गत भटके विमुक्त व भटक्या जमातीच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजना व आवश्यक प्रमाणपत्रांचा लाभ मिळवून देण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर येथील माळी समाज मंगल कार्यालय, येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तहसीलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचा पिंपळगाव हरेश्वरसह पंचक्रोशीतील वरसाडे प्र पा, तांडा , भोजे, शिंदाड, डांभुर्णी पिंप्री येथीलं नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. विविध शासकीय योजना, प्रमाणपत्रे व शासनाच्या सुविधांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे अनेक नागरिकांना प्रत्यक्ष फायदा झाला.

शिबिराच्या आयोजनामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी झाली असून, अशा प्रकारची शिबिरे अधूनमधून आयोजित करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
या कार्यक्रमाला तहसिल कार्यालयातील अनेक विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गावातीलं जेष्ठ नागरीक गिते सर, श्री रवि गिते, डाॅ. नितीन चव्हाण, श्री. विकास लोहार, श्री शिवदास चव्हाण, श्री. आनंदा राठोड व इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे शिबिराचे नियोजन यशस्वी झाले.
पंचक्रोशीतील नागरिकांसाठी उपयुक्त ठरलेले हे शिबिर भविष्यातही अशाच प्रकारे आयोजित करण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

कसळाबाई शंकर पवार आश्रमशाळेच्या नूतन वास्तूची आमदार मा.श्री किशोरआप्पा पाटील यांच्याहस्ते दिमाखात पायाभरणी; ऊसतोड कामगार, शेतकरी व गोरगरीबांच्या लेकरांसाठी उभारणार नविन ज्ञानमंदिर
पाचोरा : ग्रामीण भागातील गरीब आणि कष्टकरी कुटुंबातील मुलांच्या स्वप्नांना आता भक्कम वास्तूची साथ मिळणार आहे. ग्राम विकास मंडळ, पिंपळगाव हरेश्वर संचलित श्रीमती कसळाबाई शंकर पवार प्राथमिक व माध्यमिक आश्…

रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभ आराखडा तयार करण्याचे ग्रामरोजगार सेवकांचे आवाहन...
शेतकरी व लाभार्थ्यांनी 30 जानेवारी 2026 पूर्वी माहिती सादर करण्याचे आवाहन....गावातील रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पुढील पाच वर्षांचा वैयक्तिक लाभ आराखडा (Individual Benefit Plan) तयार करण्यात …

कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव संचालकपदी शालिग्राम ओंकार मालकर यांची बिनविरोध निवड
पाचोरा :पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी शालिग्राम ओंकार मालकर यांची बिनविरोध निवड झाली असून, त्यांच्या निवडीबद्दल कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या …

वरसाडे तांडा(पाचोरा) येथीलं आश्रम शाळेत उत्साहात भटके विमुक्त दिन साजरा. गुणवंताचा सत्कार, कार्यक्रमाची रेलचेल..
वरसाडे प्र पा (ता. पाचोरा ) – श्रीमती कसळाबाई शकंर पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा येथे आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी भटके विमुक्त दिन मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा कर…