रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

पंचक्रोशी न्यूजवरसाडे पंचक्रोशीतील बातम्या · राज्य व राष्ट्रीय घडामोडी
ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर.. धरणात पाण्याची कमतरता.. भविष्यात पाणीटंचाईची भितीMPSC आंदोलनाची व्यापी वाढली. अनेक विरोधी नेत्यांची आंदोलनाला भेटदुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा
जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..

महाराष्ट्रात सध्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR – Special Summary Revision) प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पडताळणी केली जात आहे.…

पंचक्रोशी न्यूज१५ मार्च, २०२६ रोजी ६:०६ PM वाजता
वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..

महाराष्ट्रात सध्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR – Special Summary Revision) प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पडताळणी केली जात आहे. या प्रक्रियेअंतर्गत संबंधित भागातील बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) नागरिकांच्या घरी भेट देऊन मतदारांची माहिती तपासत आहेत.



या प्रक्रियेमध्ये ज्या महिला व पुरुष मतदारांची नावे सुमारे २० वर्षांपासून मतदार यादीत आहेत, त्यांची नावे बहुतांश सुरक्षित मानली जात आहेत. त्यामुळे अशा जुन्या मतदारांना विशेष अडचण येण्याची शक्यता कमी आहे.

मात्र ४० वर्षांखालील काही मतदारांच्या बाबतीत अधिक तपासणी केली जात आहे. अशा मतदारांचे नाव कायम ठेवण्यासाठी त्यांच्या वडिलांचे नाव सुमारे २० ते २२ वर्षांपूर्वीच्या मतदार यादीत होते का, याची पडताळणी केली जात आहे. यासाठी BLO घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत.

दरम्यान, लग्न झालेल्या महिला मतदारांसाठी प्रक्रिया थोडी अधिक किचकट असल्याचे दिसून येत आहे. विवाहित महिलेचे नाव मतदार यादीत सुरक्षित राहण्यासाठी तिच्या माहेरच्या गावातील माहितीची पडताळणी केली जाते. यासाठी महिलेने माहेरचे राज्य, जिल्हा, मतदारसंघ, गावाचे नाव तसेच वडील किंवा आईचे नाव BLO यांना सांगणे आवश्यक आहे. संबंधित गावातील जुन्या मतदार यादीत ही माहिती योग्य आढळल्यासच त्या महिलेचे नाव सुरक्षित राहते.

जर अशा प्रकारे पडताळणी होऊ शकली नाही, तर संबंधित मतदाराने निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या कागदपत्रांपैकी कोणताही एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच मतदाराचे नाव यादीत कायम ठेवले जाते.

निवडणूक आयोगाने मान्य केलेले काही प्रमुख पुरावे पुढीलप्रमाणे आहेत :

पासपोर्ट

जन्म दाखला

शैक्षणिक प्रमाणपत्र (दहावी किंवा समकक्ष)


कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाईल)

केंद्र किंवा राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र / पेन्शन आदेश

जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC)

वनहक्क प्रमाणपत्र (लागू असल्यास)

शासनाकडून मिळालेल्या जमीन किंवा घर वाटपाचा दाखला

स्थानिक स्वराज्य संस्थेची कुटुंब नोंदवही / नोंद

१ जुलै १९८७ पूर्वीचे सरकारी नोंदवहीतील कागदपत्र

आधार कार्ड (ओळख पुरावा म्हणून)

राष्ट्रीय नागरिक नोंदणीतील (NRC) नोंद (लागू असल्यास)

इतर अधिकृत सरकारी नोंदीतील प्रमाणपत्र

दरम्यान, अनेक मतदार कामानिमित्त घराबाहेर असल्यामुळे पडताळणीच्या वेळी ते घरी नसतात. त्यामुळे आपल्या वरसाडे प्र पा भागातील BLO गणपत भिंगोले सर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काही कारणास्तव भेट होऊ शकली नाही, तर मतदारांनी किंवा कुटुंबप्रमुखांनी स्वतः पुढाकार घेऊन नाव पडताळणीसाठी BLO यांना प्रत्यक्ष भेटावे, असे त्यांनी सांगितले.

मतदारांनी वेळेत पडताळणी पूर्ण केल्यास भविष्यात मतदानाचा हक्क अबाधित राहण्यास मदत होणार आहे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
ताज्या बातम्या१३ सप्टेंबर, २०२६ रोजी २:२० PM वाजता

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

उद्या साजऱ्या होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण असून मंडळे, बाजारपेठा आणि घरगुती गणेशभक्तांकडून अंतिम तयारीला वेग आला आहे.

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..
ताज्या बातम्या२८ फेब्रुवारी, २०२६ रोजी ११:०८ PM वाजता

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..

पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २५ वर्षीय विजय राठोड हा तरुण मध्यरात्रीपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.…

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष?  गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव
ताज्या बातम्या१३ फेब्रुवारी, २०२६ रोजी ११:५८ PM वाजता

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष? गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव

भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींना पंचायत समिती स्तरावर दखल न मिळाल्याने अखेर नागरिकाने थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…

वरसाडे तांड्यावरून उभा राहिलेला सूर : ओम साई बँन्डची यशोगाथा.. वार्षिक टर्नओव्हर 40-50 लाख....
ताज्या बातम्या१६ जानेवारी, २०२६ रोजी ३:१५ PM वाजता

वरसाडे तांड्यावरून उभा राहिलेला सूर : ओम साई बँन्डची यशोगाथा.. वार्षिक टर्नओव्हर 40-50 लाख....

यश म्हणजे अचानक मिळालेली संधी नाही, तर संकटांशी झुंज देत, परिस्थितीवर मात करत घडवलेली गोष्ट असते. ग्रामीण भागात, विशेषतः तांड्यावर जन्मलेल्या तरुणांसाठी शिक्षण, संधी आणि साधनांची कमतरता ही नेहमीचीच बा…

जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा