रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

पंचक्रोशी न्यूजवरसाडे पंचक्रोशीतील बातम्या · राज्य व राष्ट्रीय घडामोडी
ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर.. धरणात पाण्याची कमतरता.. भविष्यात पाणीटंचाईची भितीMPSC आंदोलनाची व्यापी वाढली. अनेक विरोधी नेत्यांची आंदोलनाला भेटदुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा
जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

अटी व शर्ती

शेवटचा बदल: १३ सप्टेंबर २०२६

panchkroshinews.in या संकेतस्थळाचा (यापुढे “पंचक्रोशी न्यूज”) वापर करण्यापूर्वी खालील अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात. संकेतस्थळाचा वापर करणे म्हणजे या अटी मान्य असल्याचे समजले जाईल.

१. संकेतस्थळाचा वापर

पंचक्रोशी न्यूजवरील मजकूर केवळ वाचनासाठी व माहितीसाठी उपलब्ध आहे. संकेतस्थळाचा वापर बेकायदेशीर कारणांसाठी, इतरांना त्रास देण्यासाठी, किंवा संकेतस्थळाच्या कार्यात अडथळा आणण्यासाठी करता येणार नाही.

२. मजकुराचे हक्क

या संकेतस्थळावरील बातम्या, लेख, छायाचित्रे, चित्रफिती आणि बोधचिन्ह यांचे सर्व हक्क पंचक्रोशी न्यूजकडे राखीव आहेत. पूर्वपरवानगीशिवाय हा मजकूर इतरत्र प्रसिद्ध करणे, पुनर्मुद्रित करणे किंवा व्यावसायिक कारणांसाठी वापरणे यास मनाई आहे.

बातमी शेअर करताना मूळ दुवा (link) देऊन शेअर करावी. समाजमाध्यमांवर बातमीचा दुवा शेअर करण्यास कोणतीही हरकत नाही.

३. मजकुराची अचूकता

बातम्या शक्य तितक्या अचूक आणि शहानिशा करून प्रसिद्ध केल्या जातात. तथापि, कोणत्याही मजकुरातील चूक, विलंब किंवा त्रुटीबाबत पंचक्रोशी न्यूज कायदेशीर जबाबदारी स्वीकारत नाही. चूक निदर्शनास आल्यास ती दुरुस्त करण्यात येईल — त्यासाठी तक्रार निवारण विभागाशी संपर्क साधावा.

४. वाचकांनी पाठवलेला मजकूर

वाचकांनी पाठवलेल्या बातम्या, छायाचित्रे किंवा माहिती प्रसिद्ध करण्याचा अथवा न करण्याचा अंतिम अधिकार संपादकांकडे राहील. असा मजकूर पाठवणाऱ्याने तो स्वतःचा असल्याची किंवा प्रसिद्ध करण्याचा अधिकार असल्याची खात्री द्यावी. चुकीच्या किंवा दुसऱ्याच्या हक्कातील मजकुरामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी पाठवणाऱ्यावर राहील.

५. जाहिराती

संकेतस्थळावरील जाहिरातींमधील दावे, मते व माहिती ही संबंधित जाहिरातदाराची असते. जाहिरातदाराशी व्यवहार करण्यापूर्वी वाचकांनी स्वतःची खात्री करून घ्यावी. अशा व्यवहारांतील नफा-तोट्यास पंचक्रोशी न्यूज जबाबदार राहणार नाही.

६. बाह्य दुवे

काही लेखांमध्ये इतर संकेतस्थळांचे दुवे असू शकतात. त्या संकेतस्थळांवरील मजकूर व धोरणांबाबत पंचक्रोशी न्यूज जबाबदार नाही.

७. अटींमधील बदल

या अटी वेळोवेळी बदलण्याचा अधिकार पंचक्रोशी न्यूजकडे राखीव आहे. बदल या पानावर प्रसिद्ध केले जातील.

८. कायदेशीर अधिकारक्षेत्र

या अटींच्या अनुषंगाने उद्भवणारे कोणतेही वाद जळगाव जिल्हा, महाराष्ट्र येथील न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात येतील.

९. संपर्क

अटी व शर्तींबाबत शंका असल्यास Panchkroshinews@gmail.com वर संपर्क साधावा.

जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा