तक्रार निवारण
पंचक्रोशी न्यूजवर प्रसिद्ध झालेल्या एखाद्या बातमीबाबत, छायाचित्राबाबत किंवा मजकुराबाबत आपली तक्रार असल्यास खालील अधिकाऱ्यांकडे ती नोंदवता येईल. माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल माध्यम आचारसंहिता) नियम, २०२१ अंतर्गत ही माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
तक्रार निवारण अधिकारी / संपादक
विलास नवले
- ईमेल: Panchkroshinews@gmail.com
- दूरध्वनी / व्हॉट्सअॅप: 8390990344
- पत्ता: वरसाडे प्र. पा., ता. पाचोरा, जि. जळगाव, महाराष्ट्र
तक्रार कशी करावी
तक्रार नोंदवताना पुढील तपशील कळवावा, म्हणजे ती लवकर निकाली काढता येते:
- तक्रारदाराचे नाव, गाव आणि संपर्क क्रमांक
- ज्या बातमीबाबत तक्रार आहे तिचा दुवा (link) किंवा मथळा
- बातमीतील नेमका कोणता भाग आक्षेपार्ह आहे
- तक्रारीस पुष्टी देणारी कागदपत्रे किंवा पुरावा, असल्यास
किती वेळात उत्तर मिळेल
- तक्रार मिळाल्याची पोच २४ तासांत दिली जाईल.
- तक्रारीवर निर्णय घेऊन १५ दिवसांच्या आत कळवले जाईल.
दुरुस्ती धोरण
बातमीत तथ्यात्मक चूक आढळल्यास ती तातडीने दुरुस्त केली जाते. मोठी चूक असल्यास बातमीखाली दुरुस्तीची स्पष्ट नोंद केली जाते. चुकीची बातमी पूर्णपणे मागे घेण्याचा अधिकार संपादकांकडे राहील.
समाधान न झाल्यास
आमच्या उत्तराने समाधान न झाल्यास, तक्रारदार माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडे दाद मागू शकतात.