वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २५ वर्षीय विजय राठोड हा तरुण मध्यरात्रीपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.…

पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २५ वर्षीय विजय राठोड हा तरुण मध्यरात्रीपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेला तीन ते चार दिवस उलटूनही त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, विजय घरातून बाहेर पडला; मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. तो पायी दूरवर जाण्याची शक्यता कमी असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तो कोणाच्या वाहनावरून गावाबाहेर गेला ? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
विजयचा मोबाईल फोन मागील काही दिवसांपासून बंद येत असून, त्याने घरातून किंवा गावातुन निघण्यापूर्वी शेवटचा फोन कोणाला केला होता, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याला कोणीतरी पैशांचे आमिष दाखवून इतरत्र बोलावले होते का, याचाही तपास व्हावा, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, विजय कोणत्याही मित्र किंवा नातेवाईकांकडे नसल्याची खात्री कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे बेपत्ता होण्यामागे काही संशयास्पद बाब आहे का, याबाबत चर्चा सुरू आहेत.
कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पंचक्रोशीतील रत्यावरीलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात यावी, तसेच विजयच्या बँक खात्यांमधील अलीकडील व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, त्यामधुन काही धागेदोरे मिळू शकेलं म्हणून तपासाची मागणी कूटूंबीय करणार आहे.
आवाहन:
संबंधित युवक विजय राठोड कुठेही आढळल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी किंवा कुटुंबीयांनी जाहीर केलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, मो. 9326675634, 8788917820 असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
उद्या साजऱ्या होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण असून मंडळे, बाजारपेठा आणि घरगुती गणेशभक्तांकडून अंतिम तयारीला वेग आला आहे.

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..
महाराष्ट्रात सध्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR – Special Summary Revision) प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पडताळणी केली जात आहे.…

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष? गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव
भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींना पंचायत समिती स्तरावर दखल न मिळाल्याने अखेर नागरिकाने थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…

वरसाडे तांड्यावरून उभा राहिलेला सूर : ओम साई बँन्डची यशोगाथा.. वार्षिक टर्नओव्हर 40-50 लाख....
यश म्हणजे अचानक मिळालेली संधी नाही, तर संकटांशी झुंज देत, परिस्थितीवर मात करत घडवलेली गोष्ट असते. ग्रामीण भागात, विशेषतः तांड्यावर जन्मलेल्या तरुणांसाठी शिक्षण, संधी आणि साधनांची कमतरता ही नेहमीचीच बा…