रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

पंचक्रोशी न्यूजवरसाडे पंचक्रोशीतील बातम्या · राज्य व राष्ट्रीय घडामोडी
ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर.. धरणात पाण्याची कमतरता.. भविष्यात पाणीटंचाईची भितीMPSC आंदोलनाची व्यापी वाढली. अनेक विरोधी नेत्यांची आंदोलनाला भेटदुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा
जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

वरसाडे प्र पा तांडा ( पाचोरा) गावात शिवसेनेची कमान सुशिक्षित युवांच्या हाती...

पाचोरा (जळगाव) :वरसाडे गावातील सुशिक्षित आणि समाजकार्यासाठी तत्पर असलेल्यांना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात चालणाऱ्या शिवसेनेत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.…

पंचक्रोशी न्यूज२५ ऑगस्ट, २०२५ रोजी ७:२७ PM वाजता
वरसाडे प्र पा तांडा ( पाचोरा) गावात शिवसेनेची कमान सुशिक्षित युवांच्या हाती...

 पाचोरा (जळगाव) :

वरसाडे गावातील सुशिक्षित आणि समाजकार्यासाठी तत्पर असलेल्यांना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात चालणाऱ्या  शिवसेनेत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्हा प्रमुख (शिवसेना, जळगाव) रावसाहेब मनोहर गिरधर पाटील यांच्या उपस्थितीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून ही जबाबदारी देण्यात आली. या नियुक्तीनंतर गावात आणि तालुक्यात शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आनंद विजय राठोड (सिव्हिल इंजिनिअर) यांची पिंपळगाव-शिंदाड जिप गट शिवसेना विभाग प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

आनंद राठोड हे सिव्हिल इंजिनिअर असून, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच तरुणांमध्ये संघटन कौशल्य आणि इंजिनीअर असल्यामुळे त्यांच्याकडे विकासाभिमुख दृष्टीकोन आहे. झटपट निर्णय घेण्यांची क्षमता त्यांच्याकडे आहे अस गावातीलं तरुणांचे मत आहे.

डाँ नितीन चव्हाण यांची शिवसेना उपतालुका संघटक पिंपळगाव-शिंदाड झेडपी गटपदी नियुक्ती झाली असून,

डॉ. नितीन चव्हाण हे वैद्यकीय क्षेत्रातील सुशिक्षित व्यक्तिमत्त्व असून, सामाजिक आरोग्यविषयक कार्यातही त्यांचा नेहमी पुढाकार असतो.  दोघेही आपल्या-आपल्या वार्डात अग्रेसर असून, विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आले आहेत. गावातील तरुणांना दिशा देणे, विकासात्मक कामांमध्ये सहभाग घेणे आणि शिवसेनेची विचारधारा घराघरात पोहचवणे, या गोष्टींसाठी त्यांचे योगदान विशेष राहिले आहे.

 “गावातील सुशिक्षित आणि कार्यक्षम तरुणांना जबाबदारी दिल्यामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होणार आहे. समाजातील विविध समस्यांचे निराकरण करून विकास साधण्यासाठी ही पावले उपयुक्त ठरतील,” अशा भावना व्यक्त होत आहेत.

शिवसेना जिल्हा प्रमुखांनी सांगितले की, “सुशिक्षित तरुणच भविष्यात राजकारणात सकारात्मक बदल घडवू शकतात. डॉ. नितीन चव्हाण व आनंद राठोड यांच्या माध्यमातून पक्ष संघटन नक्कीच बळकट होईल, असा मला विश्वास आहे.”

या नियुक्तीनंतर गावातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

Varsade pra pa 

panchkroshi news



जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
ताज्या बातम्या१३ सप्टेंबर, २०२६ रोजी २:२० PM वाजता

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

उद्या साजऱ्या होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण असून मंडळे, बाजारपेठा आणि घरगुती गणेशभक्तांकडून अंतिम तयारीला वेग आला आहे.

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..
ताज्या बातम्या१५ मार्च, २०२६ रोजी ६:०६ PM वाजता

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..

महाराष्ट्रात सध्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR – Special Summary Revision) प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पडताळणी केली जात आहे.…

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..
ताज्या बातम्या२८ फेब्रुवारी, २०२६ रोजी ११:०८ PM वाजता

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..

पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २५ वर्षीय विजय राठोड हा तरुण मध्यरात्रीपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.…

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष?  गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव
ताज्या बातम्या१३ फेब्रुवारी, २०२६ रोजी ११:५८ PM वाजता

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष? गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव

भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींना पंचायत समिती स्तरावर दखल न मिळाल्याने अखेर नागरिकाने थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…

जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा