जळगाव जिल्ह्याचे भडगाव तालुक्यातील वीर सुुपुत्र स्वप्निल सोनवणे यांना वीरमरण..
वीर जवान अमर रहे!जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र, भारतीय सैन्यात कर्तव्य बजावणारे भडगाव तालुक्यातील गुढे गावचे जवान स्वप्निल सोनवणे यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले.…

वीर जवान अमर रहे!
जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र, भारतीय सैन्यात कर्तव्य बजावणारे भडगाव तालुक्यातील गुढे गावचे जवान स्वप्निल सोनवणे यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. संपुर्ण देश त्यांच्या या त्यागाचा व बलिदानाचा आजन्म ऋणी असेल. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भारतीय सैनिक हे केवळ सीमांचे रक्षक नसतात, तर ते आपल्या प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नांचे, स्वातंत्र्याचे आणि भविष्याचे प्रहरी असतात. ते थंडीत, उष्णतेत, पावसात, अथांग पर्वतांवर आणि रणभूमीवर दिवस-रात्र पहारा देतात. स्वतःच्या सुखसोयी, कुटुंब आणि आयुष्याचा त्याग करून ते मातृभूमीच्या रक्षणासाठी अखंड उभे असतात. त्यांचा त्याग, धैर्य आणि निष्ठा हीच खरी देशभक्तीची मूर्ती आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🇮🇳🙏
संबंधित बातम्या

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
उद्या साजऱ्या होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण असून मंडळे, बाजारपेठा आणि घरगुती गणेशभक्तांकडून अंतिम तयारीला वेग आला आहे.

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..
महाराष्ट्रात सध्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR – Special Summary Revision) प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पडताळणी केली जात आहे.…

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २५ वर्षीय विजय राठोड हा तरुण मध्यरात्रीपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.…

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष? गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव
भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींना पंचायत समिती स्तरावर दखल न मिळाल्याने अखेर नागरिकाने थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…