रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

पंचक्रोशी न्यूजवरसाडे पंचक्रोशीतील बातम्या · राज्य व राष्ट्रीय घडामोडी
ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर.. धरणात पाण्याची कमतरता.. भविष्यात पाणीटंचाईची भितीMPSC आंदोलनाची व्यापी वाढली. अनेक विरोधी नेत्यांची आंदोलनाला भेटदुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा
जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

वरसाडे तांडा येथे बाबा रामदेवजी ग्यारस निमित्त तरुण मंडळी भजनात तल्लीन, गाव भक्तीमय, जेष्ठ गावकऱ्यांचे कौतुक...

वरसाडे प्र पा ( पाचोरा ) भाद्रपद शुक्ल एकादशी, म्हणजेच बाबा रामदेवजी ग्यारस हा बंजारा समाजाचा मोठा सण. ग्यारस उत्सव फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून अकरा दिवसांच्या सतत भजन-कीर्तनासह चालतो, बाबा रामद…

पंचक्रोशी न्यूज३० ऑगस्ट, २०२५ रोजी ११:०८ PM वाजता
वरसाडे तांडा येथे बाबा रामदेवजी ग्यारस निमित्त तरुण मंडळी भजनात तल्लीन, गाव भक्तीमय, जेष्ठ गावकऱ्यांचे कौतुक...

वरसाडे प्र पा ( पाचोरा ) भाद्रपद शुक्ल एकादशी, म्हणजेच बाबा रामदेवजी ग्यारस हा बंजारा समाजाचा मोठा सण. ग्यारस उत्सव फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून अकरा दिवसांच्या सतत भजन-कीर्तनासह चालतो, बाबा रामदेवजीवरीलं श्रद्धेने वरसाडे तांड्यातील तरुण मंडळी सलग अकरा दिवस रात्रभर भजनात तल्लीन झाली आहेत..

भजनात सहभागी तरुण युवक सजंय जाधव, विजय राठोड, प्रविण चव्हाण, दत्तु चव्हाण, किशोर राठोड,पृथ्वी चव्हाण, खुशाल राठोड, रमेश राठोड, गोपाल चव्हाण, मच्छिद्र जाधव, हेमंत जाधव, जितू राठोड, आकाश चव्हाण, ज्ञानेश्वर जाधव

21व्या शतकात मोबाईल, सोशल मिडियाच्या युगात तरुणांनी भजनाची आवड जपली, ही साधी बाब नाही. त्यांच्या भक्तीभावाने आणि उत्साहाने गाव भक्तीमय झाले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक आनंदी झाले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

भक्तीमय भजनी वातावरणात रमलेल्या तरुणांची एक झलक

सलग अकरा दिवस रात्री चालणारा हा भजनोत्सव तांड्यातील वातावरण भक्तीमय करत असून बाबा रामदेवजींच्या ग्यारस उत्सवाला अधिक तेजस्वी बनवत आहे...


बाबा रामदेवजींना अनेक समाजातील लोक भक्तीभावाने मानतात. राजपुत समाज , बंजारा समाज, मेघवाल / मेघवंशीय समाज, चामर समाज, माळी समाज, हरिजन समाज, मुस्लिम समाजातील काही पीर भक्त देखील त्यांना पीर म्हणून मानतात. त्यामुळे फक्त तांडा नव्हे तर पुर्ण पंचक्रोशी रात्रभर भक्तीमय वातावरणात मग्न झाली आहे.

रामदेवजी बाबा भजन मंडळी तांडा नं 3

बाबा रामदेवजी हे १४व्या शतकातील एक महान संत, लोकदेवता आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या जीवनात समानता, एकात्मता आणि समाजसेवा यांना प्राधान्य दिले. त्यांनी उच्च-नीच, श्रीमंत-गरीब यातील भेदभाव नाकारून सर्वांना समान मानले. त्यांचा संदेश सर्वधर्मसमभावाचा होता. मुस्लिम पिरांनाही त्यांनी आपले भक्त केले आणि कदाचित म्हणुनचं त्यांना रामशाह पीर म्हणून ओळखले जाते. बाबा रामदेवजींचे भक्त सांगतात की, त्यांच्या जीवनात अनेक चमत्कारी घटनांची नोंद आहे. एक प्रसंग असा आहे की, भैरव राक्षस या दुष्ट शक्तीला पराभूत करून त्यांनी लोकांचे रक्षण केले. 

बाबा रामदेवजी ( photo source : wikipedia)
राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांतील विविध जाती-धर्मातील लोक त्यांना लोकदेवता, संत आणि पीर म्हणून मानतात व पुजतात.
रामदेवरा येथे याच ठिकाणी बाबा रामदेवजी यांनी जिवंत समाधी घेतली होती अशी भक्तीभावना भक्तांमध्ये आहे. या ठिकाणी ग्यारसच्या दिवशी लाखो लोक नतमस्तक  होतात.( photo source : wikipedia)


भाद्रपद शुक्ल एकादशीच्या ( ग्यारस ) या दिवशी वरसाडे तांड्यात उत्साह असतो. भंडारा बनवला जात असतो. या महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. 

जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
ताज्या बातम्या१३ सप्टेंबर, २०२६ रोजी २:२० PM वाजता

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

उद्या साजऱ्या होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण असून मंडळे, बाजारपेठा आणि घरगुती गणेशभक्तांकडून अंतिम तयारीला वेग आला आहे.

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..
ताज्या बातम्या१५ मार्च, २०२६ रोजी ६:०६ PM वाजता

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..

महाराष्ट्रात सध्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR – Special Summary Revision) प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पडताळणी केली जात आहे.…

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..
ताज्या बातम्या२८ फेब्रुवारी, २०२६ रोजी ११:०८ PM वाजता

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..

पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २५ वर्षीय विजय राठोड हा तरुण मध्यरात्रीपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.…

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष?  गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव
ताज्या बातम्या१३ फेब्रुवारी, २०२६ रोजी ११:५८ PM वाजता

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष? गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव

भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींना पंचायत समिती स्तरावर दखल न मिळाल्याने अखेर नागरिकाने थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…

जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा