सोयगाव-धुळे बसला भीषण अपघात : उंदीरखेडा येथील तरुण ठार, तर दोन गंभीर जखमी व अनेक किरकोळ जखमी..
दि.20 आँगस्ट 2025.सोयगावहून पिंपळगाव हरेश्वर - पाचोरा मार्गे धुळ्याकडे जाणारी सोयगाव डेपोची एसटी बस क्र. MH-14-BT-1984 आणि खासगी आयसर टेम्पो क्र. MH-19-CY-1606 यांची जोरदार धडक बसली.…

दि.20 आँगस्ट 2025.
सोयगावहून पिंपळगाव हरेश्वर - पाचोरा मार्गे धुळ्याकडे जाणारी सोयगाव डेपोची एसटी बस क्र. MH-14-BT-1984 आणि खासगी आयसर टेम्पो क्र. MH-19-CY-1606 यांची जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत बसमधील एक जण मृत्युमुखी तर अनेक प्रवासी जखमी झाले.
अपघातात पंकज पाटील वय ३०, उंदीरखेडा यांचा मृत्यू झाला असून जखमींना रुग्णांना तातडीने पारोळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
1. मिराबाई पंढरी सोनवणे (५५, सोयगाव)
2. निलाबाई घनश्याम सिरसागर (७५, धुळे)
3. अंजनाबाई रघुनाथ पाटील (७०, हनुमंतखेडा)
4. मनोहर सज्जन पाटील (६०, चोरवड)
5. रमेशा धोंडू चौधरी (८०, भडगाव)
6. मीराबाई रघुनाथ पाटील (८०, धुळे)
7. जानवी संतोष मोरे (१९, धुळे)
8. रघुनाथ गणपंत सोनवणे (ठेकु)
अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती.
गावातील काही तरुणांनी प्रवाशांना हाँस्पीटलला घेऊन जाण्यास मदत केली आणि घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णांना उपचारासाठी हलविले.
panchkroshi news
varsade pra paसंबंधित बातम्या

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
उद्या साजऱ्या होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण असून मंडळे, बाजारपेठा आणि घरगुती गणेशभक्तांकडून अंतिम तयारीला वेग आला आहे.

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..
महाराष्ट्रात सध्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR – Special Summary Revision) प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पडताळणी केली जात आहे.…

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २५ वर्षीय विजय राठोड हा तरुण मध्यरात्रीपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.…

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष? गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव
भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींना पंचायत समिती स्तरावर दखल न मिळाल्याने अखेर नागरिकाने थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…