रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

पंचक्रोशी न्यूजवरसाडे पंचक्रोशीतील बातम्या · राज्य व राष्ट्रीय घडामोडी
ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर.. धरणात पाण्याची कमतरता.. भविष्यात पाणीटंचाईची भितीMPSC आंदोलनाची व्यापी वाढली. अनेक विरोधी नेत्यांची आंदोलनाला भेटदुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा
जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

वरसाडे प्र पा गावात दरवर्षी प्रमाणे तीन ठिकाणी फडकला तिंरगा. ग्रामपंचायत , जि. प. शाळा , आश्रम शाळा. ७९ व्या स्वातंत्र दिनाचे काही खास क्षण तुमच्यासाठी..

वरसाडे दि. 15 आँगस्ट 2025 : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी वरसाडे गाव देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले. गावातुन शालेय विद्यार्थ्यांनी मिरवणुक काढल्यानंतर दरवर्षीप्रमाणे गावात तीन ठिकाणी …

पंचक्रोशी न्यूज१५ ऑगस्ट, २०२५ रोजी १:१४ PM वाजता
वरसाडे प्र पा गावात दरवर्षी प्रमाणे तीन ठिकाणी फडकला तिंरगा. ग्रामपंचायत , जि. प. शाळा , आश्रम शाळा. ७९ व्या स्वातंत्र दिनाचे काही खास क्षण तुमच्यासाठी..

वरसाडे दि. 15 आँगस्ट 2025 : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी वरसाडे गाव देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले. गावातुन शालेय विद्यार्थ्यांनी मिरवणुक काढल्यानंतर दरवर्षीप्रमाणे गावात तीन ठिकाणी अभिमानाने तिंरगा फडकला.
सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावाच्या प्रथम नागरीक सौ.सुरेखा पवन पवार सरपंचं यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण झाले. याप्रसंगी उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, व सर्व स्तरातील ग्रामस्थ उपस्थित होते. गावकऱ्यांनी एकत्र येऊन देशाच्या एकतेचा आणि प्रगतीचा संकल्प केला.



यानंतर जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ. शितल राजाराम राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. तिरंग्याला सलामी देत मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य,  शिक्षक, पालक,  आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. शाळेच्या वतीने मुलांना व कार्यक्रमाला उपस्थित सगळ्यांना तबांखुमक्तीची शपथ देण्यात आली. 



श्रीमती कसळाबाई शंकर पवार प्राथमिक , माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षक , विद्यार्थ्यांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ध्वज फडकवण्यात आला. देशभक्तीपर गाणी, कविता, कवायत आणि लहान मुलांच्या जोशपूर्ण घोषणा यामुळे दरवर्षी प्रमाणे वातावरण भारावून गेले.




स्वातंत्र दिनानिमित्त गावातील नागरीकांनी व माजी विद्यार्थ्यांनी जिल्हा परीषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. 






आज स्वातंत्र दिनाच्या मिरवणुकीनंतर गावभर ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा घुमत होत्या.
कार्यक्रमानंतर ग्रामपंचायतच्या संपुर्ण टीमने प्राथमिक आरोग्य केंद्राभोवती वृषारोपन केले. वृषारोपन करतांना सरपंच सौ सुरेखा पवार व पती श्री पवन पवार उपस्थित उपसरपंच श्री विनायक राठोड , पोलीस पाटील श्री.राजाराम राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष प्रविण , ग्रामपंचायत सदस्य श्री गोकुळ राठोड, श्री बाबुलाल चव्हाण, श्री प्रकाश जाधव , श्री अमोल राठोड , अगंणवाडी सेविका, आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.

सरते शेवटी हलक्या पाऊस झाल्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
ताज्या बातम्या१३ सप्टेंबर, २०२६ रोजी २:२० PM वाजता

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

उद्या साजऱ्या होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण असून मंडळे, बाजारपेठा आणि घरगुती गणेशभक्तांकडून अंतिम तयारीला वेग आला आहे.

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..
ताज्या बातम्या१५ मार्च, २०२६ रोजी ६:०६ PM वाजता

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..

महाराष्ट्रात सध्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR – Special Summary Revision) प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पडताळणी केली जात आहे.…

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..
ताज्या बातम्या२८ फेब्रुवारी, २०२६ रोजी ११:०८ PM वाजता

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..

पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २५ वर्षीय विजय राठोड हा तरुण मध्यरात्रीपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.…

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष?  गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव
ताज्या बातम्या१३ फेब्रुवारी, २०२६ रोजी ११:५८ PM वाजता

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष? गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव

भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींना पंचायत समिती स्तरावर दखल न मिळाल्याने अखेर नागरिकाने थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…

जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा