रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

पंचक्रोशी न्यूजवरसाडे पंचक्रोशीतील बातम्या · राज्य व राष्ट्रीय घडामोडी
ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर.. धरणात पाण्याची कमतरता.. भविष्यात पाणीटंचाईची भितीMPSC आंदोलनाची व्यापी वाढली. अनेक विरोधी नेत्यांची आंदोलनाला भेटदुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा
जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

वरसाडे प्र पा तांडा (पाचोरा) येथे आमदार किशोर पाटील यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी औषध फवारणी पंप वाटप...

वरसाडे (ता. पाचोरा, जि. जळगाव), दि. 20 ऑगस्ट 2025 : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुढाकाराने वरसाडे प्र पा तांडा येथे वसंतराव नाईक चौकात शेतकऱ्यांसाठी अनुदानित दरात…

पंचक्रोशी न्यूज२१ ऑगस्ट, २०२५ रोजी १०:३१ AM वाजता
वरसाडे प्र पा तांडा (पाचोरा) येथे आमदार किशोर पाटील यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी औषध फवारणी पंप वाटप...

 वरसाडे (ता. पाचोरा, जि. जळगाव), दि. 20 ऑगस्ट 2025 : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुढाकाराने वरसाडे प्र पा तांडा येथे वसंतराव नाईक चौकात शेतकऱ्यांसाठी अनुदानित दरात औषध फवारणी पंप वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या उपक्रमांतर्गत बाजारमूल्य ₹2,500 असलेला शेती उपयुक्त फवारणी पंप केवळ ₹1,500 मध्ये शेतकऱ्यांना देण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात शेतीसाठी आवश्यक साधन उपलब्ध झाले असून शेती उत्पादकतेत वाढ करण्यास निश्चितच मदत होणार आहे.

या कार्यक्रमाला तांडा क्र. ३ चे नाईक श्री. रंगलाल राठोड, ग्रामपंचायत सदस्य डॉ. नितीन चव्हाण, श्री. ज्ञानेश्वर (नानु) चव्हाण, श्री. लखिचंद पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली व त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फवारणी पंप वाटप केले गेले.

आमदार किशोर आप्पा पाटील यांनी हा उपक्रम  सुरु करतांनाच सांगितल आहे की, “शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम पुढेही राबवले जातील.” 

तसेच, 

वरसाडे गावातील ज्या शेतकऱ्यांना अजूनही फवारणी पंप हवे असतील त्यांनी डॉ. नितीन चव्हाण व ज्ञानेश्वर (नानु) चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास श्री. दशरथ चव्हाण, श्री. आनंद राठोड, श्री. जयेश राठोड, श्री. हेमंत जाधव, श्री. कन्हीराम पवार, श्री. गोकुळ पवार, श्री. धनराज पवार, श्री. भाईदास राठोड, श्री. पोपट राठोड, श्री. विनोद चव्हाण, श्री. भगवान बडगुजर, श्री. वाल्मिक बडगुजर यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात आधुनिक शेती साधन उपलब्ध झाल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

panchkroshi news

varsade pra pa

Ad :

For industrial Calibration & Validation


जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
ताज्या बातम्या१३ सप्टेंबर, २०२६ रोजी २:२० PM वाजता

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

उद्या साजऱ्या होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण असून मंडळे, बाजारपेठा आणि घरगुती गणेशभक्तांकडून अंतिम तयारीला वेग आला आहे.

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..
ताज्या बातम्या१५ मार्च, २०२६ रोजी ६:०६ PM वाजता

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..

महाराष्ट्रात सध्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR – Special Summary Revision) प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पडताळणी केली जात आहे.…

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..
ताज्या बातम्या२८ फेब्रुवारी, २०२६ रोजी ११:०८ PM वाजता

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..

पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २५ वर्षीय विजय राठोड हा तरुण मध्यरात्रीपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.…

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष?  गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव
ताज्या बातम्या१३ फेब्रुवारी, २०२६ रोजी ११:५८ PM वाजता

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष? गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव

भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींना पंचायत समिती स्तरावर दखल न मिळाल्याने अखेर नागरिकाने थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…

जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा