वरसाडे प्र पा ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश , वाढीव पोल बसविण्याचे काम सुरू
वरसाडे प्र पा : वरसाडे प्र पा ग्रामपंचायतीच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळाले असून गावात वाढीव पोल बसविण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे.…

वरसाडे प्र पा : वरसाडे प्र पा ग्रामपंचायतीच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळाले असून गावात वाढीव पोल बसविण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. या उपक्रमामुळे गावातील अनेक कुटुंबांना वीज कनेक्शन मिळविणे सोपे होणार असून रात्रीच्या वेळी गाव उजळून निघणार आहे.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी माजी जि. प. सदस्य मधुमाऊ काटे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सुरेखा पवन पवार, ग्रामविकासासाठी सतत झटणारे सरपंचपती पवन पवार, उपसरपंच विनायक राठोड व ग्रामपंचायत सदस्य बंन्टी राठोड , प्रकाश जाधव यांनी विद्युत महावितरण कंपनीकडे वाढीव पोल उपलब्ध करून देण्याबाबत ठोस मागणी केली होती.

मादी जि. प. सदस्य काटे यांनी या मागणीचा वेळोवेळी पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
आज प्रत्यक्ष पोल गावात येऊन बसविण्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पोलवर बसणाऱ्या लाईटमुळे अंधारलेल्या रस्त्यांना प्रकाश मिळेल. त्यामुळे रात्री गावकऱ्यांना सहजपणे ये-जा करणे सोपे होईल. शिवाय शेतकरी व विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

गावातील रहिवासी विनोद चव्हाण यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "ग्रामपंचायतीने केलेल्या प्रयत्नांसाठी आम्ही सर्वजण आभारी आहोत.” आजवर रात्री अंधारामुळे ये-जा करताना मोठी अडचण होत होती. भीती कायम वाटायची. आता नविन पोलावर सुद्धा LED लाईन लावावे. गाव उजळल्यामुळे सुरक्षितता वाढेल.
या कामाचे ग्रामस्थांनी स्वागत करून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व माजी जि. प. सदस्य यांचे आभार मानले आहेत.
संबंधित बातम्या

दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा
वरसाडे तांडा येथील शेतकरी कैलास प्रधान राठोड यांनी आज (शुक्रवार) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे वरसाडे तांडा परिसरात शोककळा पसरली असून गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वरसाडे तांडा येथे विशेष शिबीर ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानाअंतर्गत रेशनकार्ड, मतदानकार्ड, नाव दुरुस्ती तसेच विविध योजनांचा नागरिकांना घेतला लाभ..
तहसील प्रशासन, स्थानिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे नागरिकांची शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी झाली असून, नागरिकांनी शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले व शिबीर गावात आणल्याबद्दल माजी. जि.प सदस्य मधुभाऊ काटे व अमोल राठोड यांचे गावकऱ्यांनी कौतुक केले.

वरसाडे गावाचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात; मुतारी–गटारींची भीषण अवस्था, डासांचा उपद्रव वाढला
वरसाडे (ता. पाचोरा ) – गावातील नागरीकांचे आरोग्य गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड धोक्यात आले असून स्थानिक मुतारी आणि गटारींची दयनीय अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.…

जि.प. शाळा वरसाडे तांडा ( वरसाडे प्र पा ) नव्या रंगात झळकली; भिंतींवरील चित्र व सुविचारांनी परिसर उजळला...
वरसाडे प्र पा, पाचोरा (जळगाव)वरसाडे तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता नव्या रूपात खुलून दिसत आहे. शाळेची व कंपाऊंड भिंतीची पूर्वी जी अवस्था होती ती आता पूर्ण बदलली आहे.…