रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

पंचक्रोशी न्यूजवरसाडे पंचक्रोशीतील बातम्या · राज्य व राष्ट्रीय घडामोडी
ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर.. धरणात पाण्याची कमतरता.. भविष्यात पाणीटंचाईची भितीMPSC आंदोलनाची व्यापी वाढली. अनेक विरोधी नेत्यांची आंदोलनाला भेटदुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा
जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

वरसाडे गावाचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात; मुतारी–गटारींची भीषण अवस्था, डासांचा उपद्रव वाढला

वरसाडे (ता. पाचोरा ) – गावातील नागरीकांचे आरोग्य गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड धोक्यात आले असून स्थानिक मुतारी आणि गटारींची दयनीय अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.…

पंचक्रोशी न्यूज२३ नोव्हेंबर, २०२५ रोजी ९:३७ PM वाजता
वरसाडे गावाचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात; मुतारी–गटारींची भीषण अवस्था, डासांचा उपद्रव वाढला

वरसाडे (ता. पाचोरा ) – गावातील नागरीकांचे आरोग्य गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड धोक्यात आले असून स्थानिक मुतारी आणि गटारींची दयनीय अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. भयानक वास परीसरात पसरत असतो. गावात गटारमध्ये जागोजागी जमा होणारी घाण, साचलेले पाणी, दुर्गंधी आणि त्यातून निर्माण होणारे डास यामुळे १२ महिने गावात रोगराईचे सावट कायम असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

 

ग्रामपंचायतीकडून खर्च… पण काम शून्य?

ग्रामपंचायत दरवर्षी सार्वजनिक आरोग्यावर निधी खर्च करत असल्याचे दाखवते. मात्र प्रत्यक्षात गेल्या अनेक वर्षांपासून गटारी व मुतारींची साफसफाई झालेलीच नाही, असा निलेश राठोड व इतर नागरिकांचा आरोप आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्याच दिसत असून पावसाळ्यात तर परिस्थिती आणखीनच बिकट होते. साचलेल्या घाणीतून दुर्गंधी पसरते आणि डासांचा प्रचंड प्रादुर्भाव जाणवतो.

गावात संक्रामक रोगांचे प्रमाण वाढतेच

गावातील ताप, मलेरिया, डेंग्यू, त्वचारोग, अतिसार यांसारख्या आजारांचे रुग्ण लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे समोर येते.  विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक वारंवार आजारी पडत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांचे लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष...

या गंभीर परिस्थितीबाबत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना विचारणा केली असता ते कोणताही स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ करतात, असा नागरिकांचा आरोप आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की

“निवडणुकीच्या वेळी सर्वजण स्वच्छतेचे मोठमोठे आश्वासन देतात, पण नंतर गावाची दयनीय अवस्थेवर चकार शब्द काढतं नाही.”

नाईलाजाने घरासमोरील गटार लोकंच साफ करतातं.

गावातीलं अनेक नागरिक नाईलाजाने स्वता: मेहनत करुन किंवा वैयक्तिक खर्च करून घरांसमोरील गटारी साफ करत असतातं, मात्र ते तात्पुरते उपाय असल्याचे स्पष्ट होते.

गावकऱ्यांची मागणी तातडीची साफसफाई व चौकशी

  • १. संपूर्ण गावात तातडीने गटारी व मुतारींची साफसफाई करावी
  • 2. डास प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी मोहिम राबवावी
  • 3. स्वच्छता निधीच्या वापराची चौकशी करावी
  • ४. ग्रामपंचायतीने सार्वजनिक आरोग्यावर नियमित अहवाल जाहीर करावा

“गाव जगायचे की रोगराईत राहायचे?”

वरसाडेतील नागरिकांचा प्रश्न अत्यंत स्पष्ट आहे. सार्वजनिक आरोग्यासारख्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास गावातील परिस्थिती येत्या काही महिन्यांत आणखी गंभीर होऊ शकते. प्रशासनाने तसेच ग्रामपंचायतीने या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहून त्वरीत उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, 

आम्हाला राजकारण नको… आमचं आरोग्य सुरक्षित हवं!

अस नागरीकांचे म्हणणे आहे.



जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या

दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा
ब्रेकिंगवरसाडे प्र पा१३ नोव्हेंबर, २०२६ रोजी ११:०२ PM वाजता

दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा

वरसाडे तांडा येथील शेतकरी कैलास प्रधान राठोड यांनी आज (शुक्रवार) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे वरसाडे तांडा परिसरात शोककळा पसरली असून गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वरसाडे तांडा येथे विशेष शिबीर  ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानाअंतर्गत रेशनकार्ड, मतदानकार्ड, नाव दुरुस्ती तसेच विविध योजनांचा नागरिकांना घेतला लाभ..
वरसाडे प्र पा६ ऑक्टोबर, २०२६ रोजी ३:४२ PM वाजता

वरसाडे तांडा येथे विशेष शिबीर ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानाअंतर्गत रेशनकार्ड, मतदानकार्ड, नाव दुरुस्ती तसेच विविध योजनांचा नागरिकांना घेतला लाभ..

तहसील प्रशासन, स्थानिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे नागरिकांची शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी झाली असून, नागरिकांनी शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले व शिबीर गावात आणल्याबद्दल माजी. जि.प सदस्य मधुभाऊ काटे व अमोल राठोड यांचे गावकऱ्यांनी कौतुक केले.

जि.प. शाळा वरसाडे तांडा ( वरसाडे प्र पा ) नव्या रंगात झळकली; भिंतींवरील चित्र व सुविचारांनी परिसर उजळला...
वरसाडे प्र पा८ नोव्हेंबर, २०२५ रोजी २:०० PM वाजता

जि.प. शाळा वरसाडे तांडा ( वरसाडे प्र पा ) नव्या रंगात झळकली; भिंतींवरील चित्र व सुविचारांनी परिसर उजळला...

वरसाडे प्र पा, पाचोरा (जळगाव)वरसाडे तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता नव्या रूपात खुलून दिसत आहे. शाळेची व कंपाऊंड भिंतीची पूर्वी जी अवस्था होती ती आता पूर्ण बदलली आहे.…

कसळाबाई शंकर पवार प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा येथे पार पडला शिक्षक-पालक मेळावा..
वरसाडे प्र पा३० सप्टेंबर, २०२५ रोजी १:०६ PM वाजता

कसळाबाई शंकर पवार प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा येथे पार पडला शिक्षक-पालक मेळावा..

वरसाडे तांडा (पाचोरा) येथील आश्रम शाळेत दि.30 सप्टेंबर रोजी मंगळवारी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच शिस्त, स्वच्छता, उपस्थिती आणि गुणवत्ता…

जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा