रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभ आराखडा तयार करण्याचे ग्रामरोजगार सेवकांचे आवाहन...
शेतकरी व लाभार्थ्यांनी 30 जानेवारी 2026 पूर्वी माहिती सादर करण्याचे आवाहन....गावातील रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पुढील पाच वर्षांचा वैयक्तिक लाभ आराखडा (Individual Benefit Plan) तयार करण्यात …

या आराखड्यात शेतकरी व ग्रामीण लाभार्थ्यांना मिळू शकणाऱ्या विविध कामांचा समावेश आहे. त्यामध्ये सिंचन विहीर, शेततळे, वृक्ष लागवड, फळबाग लागवड, गोठा शेड, जलतळे तसेच इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांची कामे यांचा समावेश होतो. शासनाच्या नव्या धोरणानुसार पुढील काळात या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांचा आराखडा तयार असणे आवश्यक राहणार आहे.ग्रामरोजगार सेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थ्यांनी आपल्या शेती किंवा प्रस्तावित कामाच्या ठिकाणाचा फोटो NoteCam अॅपद्वारे काढून, त्याची प्रिंट काढून ग्रामरोजगार सहाय्यकांना WhatsApp वर पाठवावी. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे.तसेच स्पष्ट करण्यात आले आहे की, दिलेल्या मुदतीत फोटो व आवश्यक माहिती सादर न केल्यास संबंधित लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सहाय्यक यांच्यावर त्याबाबत कोणतीही जबाबदारी राहणार नाही.“शासनाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढील योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी वेळेत कागदपत्रे व माहिती सादर करून आपल्या हक्काचा लाभ निश्चित करून घ्यावा,” असे आवाहन ग्रामरोजगार सेवकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालय किंवा संबंधित ग्राम रोजगार सहाय्यकांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
वरसाडे येथील शेतकऱ्यांना अधिक सविस्तर माहितीसाठी ग्रामरोजगार सेवक आत्माराम पवार यांचा संपर्क क्रं +91 9765793523 वर संपर्क करुन अधिक सविस्तर माहिती घेता येईलं.
संबंधित बातम्या

पिंपळगाव हरेश्वर येथे भटके-विमुक्तांसाठी विशेष शिबिर उत्साहात संपन्न
पिंपळगाव हरेश्वर येथे आयोजित विशेष शिबिराचा पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. शिबिरामुळे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा व सुविधांचा फायदा झाला. अशा प्रकारची शिबिरे अधूनमधून आयोजित करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली. कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती होती.

कसळाबाई शंकर पवार आश्रमशाळेच्या नूतन वास्तूची आमदार मा.श्री किशोरआप्पा पाटील यांच्याहस्ते दिमाखात पायाभरणी; ऊसतोड कामगार, शेतकरी व गोरगरीबांच्या लेकरांसाठी उभारणार नविन ज्ञानमंदिर
पाचोरा : ग्रामीण भागातील गरीब आणि कष्टकरी कुटुंबातील मुलांच्या स्वप्नांना आता भक्कम वास्तूची साथ मिळणार आहे. ग्राम विकास मंडळ, पिंपळगाव हरेश्वर संचलित श्रीमती कसळाबाई शंकर पवार प्राथमिक व माध्यमिक आश्…

कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव संचालकपदी शालिग्राम ओंकार मालकर यांची बिनविरोध निवड
पाचोरा :पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी शालिग्राम ओंकार मालकर यांची बिनविरोध निवड झाली असून, त्यांच्या निवडीबद्दल कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या …

वरसाडे तांडा(पाचोरा) येथीलं आश्रम शाळेत उत्साहात भटके विमुक्त दिन साजरा. गुणवंताचा सत्कार, कार्यक्रमाची रेलचेल..
वरसाडे प्र पा (ता. पाचोरा ) – श्रीमती कसळाबाई शकंर पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा येथे आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी भटके विमुक्त दिन मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा कर…