वरसाडे तांडा नं. ३ येथे काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्र. ३ येथे ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत अखेर वित्त आयोगाच्या निधीतुन काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला.…

पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्र. ३ येथे वर्जन स्थांच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत अखेर वित्त आयोगाच्या निधीतुन काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला. या कामामुळे नागरिकांना चिखल, धूळ आणि खड्ड्यांच्या त्रासातून मोठा दिलासा मिळणार आहे. घरासमोर कोणतेही वाहन आणतांना होणारा त्रास आता होणार नाहीये.

विकास धर्मा राठोड ते ईश्वर चव्हाण याच्यांघरापर्यंत काँक्रेटीकरण करणे या कामाचा शुभारंभ वरसाडे तांडा क्रं 3 येथीलं जेष्ठ नागरीक श्री. राजाराम पवार, श्री.रंगलाल राठोड, श्री.रणजित चव्हाण, श्री.बाबूलाल चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व पूजन विधी करून भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी सरपंचपती पवन पवार, उपसरपंच विनायक राठोड, ग्रामपंचायत सदस्य बंन्टी राठोड, पोलीस पाटील राजाराम राठोड तसेच गावातील नागरीक श्री.युवराज नवले, श्री. प्रेमदास पवार, श्री.धना राठोड, श्री.कांतीलाल पवार, उद्योजक श्री. प्रेमदास पवार, श्री.मकराम राठोड , वरसाडे प्र पा , वरसाडे तांडा येथीलं तंटामुक्ती अध्यक्ष श्री. प्रदिप वर्जन राठोड (पप्पु मुकादम) व स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक गल्लीतीलं नागरिकांनी सांगितले की, पावसाळ्यात रस्त्यावर चिखलामुळे मोठा त्रास होत असे. शाळेत जाणाऱ्या मुलांना, शेतमाल बाजारात नेणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच रुग्णवाहिकेला देखील अनेकदा अडचणी निर्माण होत असत. काँक्रीट रस्ता झाल्याने या गल्लीतील या सर्व समस्यांना आता पूर्णविराम मिळणार आहे.

रस्ता पुर्ण झाल्यानंतर सरपंचपती यांचा रत्यासोबतचा सेल्फी..
कार्यक्रमस्थळी सरपंचपती पवन पवार म्हणाले की, “ग्रामपंचायत नेहमी विकासकामासाठी तत्पर आहे. गावात अजूनही काही मूलभूत सुविधा उभ्या राहणे बाकी आहे. एकत्रितपणे प्रयत्न करून त्या लवकरच पूर्ण करू.”
ग्रामस्थांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले व गावाच्या प्रगतीसाठी प्रशासन व ग्रामपंचायतीने यापुढेही अशाच विकासकामांना गती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
संबंधित बातम्या

दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा
वरसाडे तांडा येथील शेतकरी कैलास प्रधान राठोड यांनी आज (शुक्रवार) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे वरसाडे तांडा परिसरात शोककळा पसरली असून गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वरसाडे तांडा येथे विशेष शिबीर ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानाअंतर्गत रेशनकार्ड, मतदानकार्ड, नाव दुरुस्ती तसेच विविध योजनांचा नागरिकांना घेतला लाभ..
तहसील प्रशासन, स्थानिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे नागरिकांची शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी झाली असून, नागरिकांनी शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले व शिबीर गावात आणल्याबद्दल माजी. जि.प सदस्य मधुभाऊ काटे व अमोल राठोड यांचे गावकऱ्यांनी कौतुक केले.

वरसाडे गावाचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात; मुतारी–गटारींची भीषण अवस्था, डासांचा उपद्रव वाढला
वरसाडे (ता. पाचोरा ) – गावातील नागरीकांचे आरोग्य गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड धोक्यात आले असून स्थानिक मुतारी आणि गटारींची दयनीय अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.…

जि.प. शाळा वरसाडे तांडा ( वरसाडे प्र पा ) नव्या रंगात झळकली; भिंतींवरील चित्र व सुविचारांनी परिसर उजळला...
वरसाडे प्र पा, पाचोरा (जळगाव)वरसाडे तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता नव्या रूपात खुलून दिसत आहे. शाळेची व कंपाऊंड भिंतीची पूर्वी जी अवस्था होती ती आता पूर्ण बदलली आहे.…