रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभ आराखडा तयार करण्याचे ग्रामरोजगार सेवकांचे आवाहन...

शेतकरी व लाभार्थ्यांनी 30 जानेवारी 2026 पूर्वी माहिती सादर करण्याचे आवाहन....
गावातील रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पुढील पाच वर्षांचा वैयक्तिक लाभ आराखडा (Individual Benefit Plan) तयार करण्यात येत असून, यासाठी आवश्यक माहिती तात्काळ सादर करावी, असे आवाहन ग्रामरोजगार सेवकांनी केले आहे.
या आराखड्यात शेतकरी व ग्रामीण लाभार्थ्यांना मिळू शकणाऱ्या विविध कामांचा समावेश आहे. त्यामध्ये सिंचन विहीर, शेततळे, वृक्ष लागवड, फळबाग लागवड, गोठा शेड, जलतळे तसेच इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांची कामे यांचा समावेश होतो. शासनाच्या नव्या धोरणानुसार पुढील काळात या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांचा आराखडा तयार असणे आवश्यक राहणार आहे.
ग्रामरोजगार सेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थ्यांनी आपल्या शेती किंवा प्रस्तावित कामाच्या ठिकाणाचा फोटो NoteCam अ‍ॅपद्वारे काढून, त्याची प्रिंट काढून ग्रामरोजगार सहाय्यकांना WhatsApp वर पाठवावी. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे.
तसेच स्पष्ट करण्यात आले आहे की, दिलेल्या मुदतीत फोटो व आवश्यक माहिती सादर न केल्यास संबंधित लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सहाय्यक यांच्यावर त्याबाबत कोणतीही जबाबदारी राहणार नाही.
“शासनाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढील योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी वेळेत कागदपत्रे व माहिती सादर करून आपल्या हक्काचा लाभ निश्चित करून घ्यावा,” असे आवाहन ग्रामरोजगार सेवकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालय किंवा संबंधित ग्राम रोजगार सहाय्यकांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

वरसाडे येथील शेतकऱ्यांना अधिक सविस्तर माहितीसाठी ग्रामरोजगार सेवक आत्माराम पवार यांचा संपर्क क्रं +91 9765793523 वर संपर्क करुन अधिक सविस्तर माहिती घेता येईलं.

टिप्पण्या