वरसाडे (ता. पाचोरा ) – गावातील नागरीकांचे आरोग्य गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड धोक्यात आले असून स्थानिक मुतारी आणि गटारींची दयनीय अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. भयानक वास परीसरात पसरत असतो. गावात गटारमध्ये जागोजागी जमा होणारी घाण, साचलेले पाणी, दुर्गंधी आणि त्यातून निर्माण होणारे डास यामुळे १२ महिने गावात रोगराईचे सावट कायम असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
ग्रामपंचायतीकडून खर्च… पण काम शून्य?
ग्रामपंचायत दरवर्षी सार्वजनिक आरोग्यावर निधी खर्च करत असल्याचे दाखवते. मात्र प्रत्यक्षात गेल्या अनेक वर्षांपासून गटारी व मुतारींची साफसफाई झालेलीच नाही, असा निलेश राठोड व इतर नागरिकांचा आरोप आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्याच दिसत असून पावसाळ्यात तर परिस्थिती आणखीनच बिकट होते. साचलेल्या घाणीतून दुर्गंधी पसरते आणि डासांचा प्रचंड प्रादुर्भाव जाणवतो.
गावात संक्रामक रोगांचे प्रमाण वाढतेच
गावातील ताप, मलेरिया, डेंग्यू, त्वचारोग, अतिसार यांसारख्या आजारांचे रुग्ण लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे समोर येते. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक वारंवार आजारी पडत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांचे लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष...
या गंभीर परिस्थितीबाबत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना विचारणा केली असता ते कोणताही स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ करतात, असा नागरिकांचा आरोप आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की
“निवडणुकीच्या वेळी सर्वजण स्वच्छतेचे मोठमोठे आश्वासन देतात, पण नंतर गावाची दयनीय अवस्थेवर चकार शब्द काढतं नाही.”
नाईलाजाने घरासमोरील गटार लोकंच साफ करतातं.
गावातीलं अनेक नागरिक नाईलाजाने स्वता: मेहनत करुन किंवा वैयक्तिक खर्च करून घरांसमोरील गटारी साफ करत असतातं, मात्र ते तात्पुरते उपाय असल्याचे स्पष्ट होते.
गावकऱ्यांची मागणी तातडीची साफसफाई व चौकशी
- १. संपूर्ण गावात तातडीने गटारी व मुतारींची साफसफाई करावी
- 2. डास प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी मोहिम राबवावी
- 3. स्वच्छता निधीच्या वापराची चौकशी करावी
- ४. ग्रामपंचायतीने सार्वजनिक आरोग्यावर नियमित अहवाल जाहीर करावा
“गाव जगायचे की रोगराईत राहायचे?”
वरसाडेतील नागरिकांचा प्रश्न अत्यंत स्पष्ट आहे. सार्वजनिक आरोग्यासारख्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास गावातील परिस्थिती येत्या काही महिन्यांत आणखी गंभीर होऊ शकते. प्रशासनाने तसेच ग्रामपंचायतीने या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहून त्वरीत उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे,
आम्हाला राजकारण नको… आमचं आरोग्य सुरक्षित हवं!
अस नागरीकांचे म्हणणे आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा