वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..


पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २५ वर्षीय विजय राठोड हा तरुण मध्यरात्रीपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेला तीन ते चार दिवस उलटूनही त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, विजय घरातून बाहेर पडला; मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. तो पायी दूरवर जाण्याची शक्यता कमी असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तो कोणाच्या वाहनावरून गावाबाहेर गेला ? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

विजयचा मोबाईल फोन मागील काही दिवसांपासून बंद येत असून, त्याने घरातून किंवा गावातुन निघण्यापूर्वी शेवटचा फोन कोणाला केला होता, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याला कोणीतरी पैशांचे आमिष दाखवून इतरत्र बोलावले होते का, याचाही तपास व्हावा, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, विजय कोणत्याही मित्र किंवा नातेवाईकांकडे नसल्याची खात्री कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे बेपत्ता होण्यामागे काही संशयास्पद बाब आहे का, याबाबत चर्चा सुरू आहेत.

कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पंचक्रोशीतील रत्यावरीलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात यावी, तसेच विजयच्या बँक खात्यांमधील अलीकडील व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, त्यामधुन काही धागेदोरे मिळू शकेलं म्हणून तपासाची मागणी कूटूंबीय करणार आहे.

आवाहन:



संबंधित युवक विजय राठोड कुठेही आढळल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी किंवा कुटुंबीयांनी जाहीर केलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, मो. 9326675634, 8788917820 असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या