जि.प. शाळा वरसाडे तांडा ( वरसाडे प्र पा ) नव्या रंगात झळकली; भिंतींवरील चित्र व सुविचारांनी परिसर उजळला...

वरसाडे प्र पा, पाचोरा (जळगाव)

वरसाडे तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता नव्या रूपात खुलून दिसत आहे. शाळेची व कंपाऊंड भिंतीची पूर्वी जी अवस्था होती ती आता पूर्ण बदलली आहे. पूर्वी साधी, फिकी व जीर्ण दिसणारी शाळा आता रंगीबेरंगी रंगांनी, आकर्षक चित्रांनी आणि प्रेरणादायी सुविचारांनी सजली आहे.


गेल्या काही दिवसांत सरपंच सुरेखा पवन पवार यांच्या संकल्पनेतुन उपसरपंच श्री.विनायक राठोड, ग्रामपंचायत सदस्य बंन्टी राठोड, प्रकाश जाधव, बाबुलाल चव्हाण,  यांच्या सहकार्याने  ग्रामपंचायतच्या माध्यमातुन या शाळेच्या इमारतीला नव्याने रंगरंगोटी करण्यात आली असून, बाहेरील भिंतींवर शालेय विषयांवरील चित्रे, अक्षरओळख, गणिती आकडे, पर्यावरणविषयक संदेश तसेच “स्वच्छता ही सेवा”, “शिक्षण हाच सर्वोत्तम दान” यांसारखे अनेक सुविचार रंगवले गेले आहेत.

शाळेच्या परिसरात आता स्वच्छता आणि आकर्षकता यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते. भिंतीवरील रंगीत चित्रांमुळे लहान मुलांमध्ये शिकण्याची उत्सुकता वाढली असून, ग्रामस्थही या बदलाने आनंदित आहेत.



गावातील नागरिक व पालक यांनी शाळेचा बदल पाहून समाधान व्यक्त केले आहे. “पूर्वी शाळा ओसाड वाटत होती, पण आता रंगीत भिंतींमुळे वातावरणच बदलले आहे,” असे एका पालकाने सांगितले.



या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ, प्रेरणादायी आणि आकर्षक वातावरणात शिक्षण घेता येणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत यांच्या सहभागातून ही सुंदर बदलाची कहाणी घडली आहे. 



याआधी अशी दिसायची जि प  शाळा...


आता शिक्षकांनीही या सुंदर कामासाठी ग्रामपंचायतचे आभार मानले.


टिप्पण्या