वरसाडे प्र पा येथील ग्रामसेवक व माजी सरपंच यांनी घरपट्टीच्या नावाखाली नागरीकांकडून पैसे लुबाडल्याचा गंभीर आरोप...

 वरसाडे प्र.पा. (ता. पाचोरा) येथील माजी सरपंच लीलाबाई शिवदास राठोड व ग्रामसेवक गोविंदा काळे यांनी सामान्य जनतेचे पैसे लुबाडल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. गटारीची समस्या सोडवण्याच्या नावाखाली नागरिकांकडून घरपट्टीचे पैसे जमा केले पण त्यांना पैसे भरल्याच्या पावत्या देण्यात आल्या नाहीत. उलट "आज देतो, उद्या देतो" अशा सबबी सांगून सरपंच व ग्रामसेवकांनी टाळाटाळ केली असा आरोप माजी उपसरपंच श्री लखीचंद पवार सहीत 10 ते 12 नागरीकांनी केला आहे.

काय होतं प्रकरण :

वरसाडे तांडा नं. 3 मध्ये गटारीची समस्या होती. स्थानिक नागरिकांनी वारंवार तात्कालीन सरपंच व ग्रामसेवकांकडे समस्या सोडवण्याची मागणी केली, पण त्यांची दखल घेतली गेली नाही. शेवटी माजी उपसरपंच श्री. लखिचंद पवार यांनी पुढाकार घेतला आणि संबंधित भागातील लोकांना "घरपट्टी भरा म्हणजे तुमच्याकडून जमा झालेल्या निधीतून ग्रामपंचायत मार्फत समस्या सोडवू" असा सल्ला दिला. 

श्री पवार यांनी सरपंच व ग्रामसेवकांची भेट घेतली. त्यांना सबंधीत कामाची कल्पना दिली. ग्रामपंचायतकडे निधी नसेल तर आमच्या भागातील लोक घरपट्टी व पाणीपट्टी जमा करतीलं. आम्हाला पैसे भरल्याच्या पावत्या द्या व जमा झालेल्या निधीतुन आमची समस्या तात्काळ सोडवा. तेंव्हा सरपंच व ग्रामसेवकांनी काम करुन देण्यास होकार दिला व अनेक लोकांकडून घरपट्टी कर जमा केला. पंरतु त्यावेळेस त्यांच्याकडे पावती बुक नव्हते. त्यांनी सगळ्यांना पावती नंतर देवु असं सांगितले. समस्या लवकर सोडवली जावी म्हणुन जमा झालेला कर सरपंच व ग्रामसेवकांच्या सांगण्याने ग्रामपंचायतच्या ग्रामनिधी खात्यात श्री.पवार यांनी स्वता जाऊन JDCC बँकेत भरला. 

बँकेंत पैसे भरल्याची पावती..
 

त्यानंतर लवकर समस्या सोडवली जावी म्हणून दुुरुस्तीसाठीचे काम ग्रामपंचायतकडून श्री.लखीचंद पवार यांनाचं देण्यात आले. काम पुर्ण झाले. कामासाठी तात्कालीन सरपंच लीलाबाई शिवदास राठोड व ग्रामसेवक गोविंदा काळे यांनी 5000 रुपयाचा चेक सही करुन श्री पवार यांना दिला. ( panchkroshi news ने याआधी ग्रामपंचायतच्या व्यवहाराची बातमी केलेली त्यामध्ये दि. 01-05-2024 या तारखेला या व्यवहाराची online नोंद आहे. ) पण ज्या सामान्य लोकांनी तेंव्हा घरपट्टी जमा करुन तो निधी जमा केला होता. त्या लोकांना जमा केलेल्या पैशाची पावती दिलीचं गेली नाही. ना तर त्यांची दप्परी घरपट्टी कमी झाली. ही सर्वसामान्य लोक वारंवार ग्रामसेवक व तात्कालीन सरपंचाकडे रीतसर पावतीची मागणी करत आहे पण ते आज देतो, उद्या देतो म्हणुन टाळाटाळ करत असल्याचे सर्व लोकांचे म्हणणे आहे. 

 
ग्रामसेवक व माजी सरपंच यांनी कामासाठी JDCC बँकेचा दिलेला चेक


अगदी असेच प्रकरण वार्ड क्र. 3 मधीलचं नागरिक श्री. नवले यांच्या बाबतीत घडले. एका कामासाठी ग्रामपंचायतीत गेले असता माजी सरपंचानी "आधी घरपट्टी व नळपट्टी भरा" त्याशिवाय काम होणार नाही असे सांगण्यात आले. मग त्यांनी 5,000 रुपये भरले, पण त्यांनाही तेंव्हा पावती देण्यात आली नाही. नंतर तर "पैसे दिलेच नाहीत" असे सरळसोट नाकारण्यात आले. मात्र पैसे दिल्याचे तेंव्हा उपस्थित मान्यवरांचे साक्षीदार हयात आहेत.


वर्तमान सरपंचांचे स्पष्टीकरण

आत्ताच्या सरपंच सौ. सुरेखा पवन पवार यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत लोकांना सांगितले की,

"हे सर्व प्रकरण माझ्या कार्यकाळात झालेले नाही. तेंव्हाचे सरपंच व ग्रामसेवक यांनी तुम्ही दिलेल्या पैशाचे काय केले याची माझ्याकडे माहिती नाही. आता जर आम्ही पावत्या दिल्या तर या पावत्यांचा हिशोब आम्हालाच द्यावा लागेल. त्यामुळे जुन्या व्यवहारा संबंधीत पावती देणार नाही." 


फसवणुकीचा डोंगर ?

गावातील मोजकेच नव्हे तर अनेक लोकांकडून घरपट्टी, पाणीपट्टीच्या नावाखाली पैसे घेतले गेले, पण पावत्या न देता ते पैसे लुबाडल्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार फक्त काही मोजकेच लोक नव्हे, तर शेकडो लोकांच्या बाबतीत घडल्याची चर्चा गावभर सुरू आहे. याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी नागरीक करत आहे. 


नागरिकांचा इशारा

फसवणूक झालेल्या नागरिकांनी पंचक्रोशी न्यूजला सांगितले की, "जर माजी सरपंच व ग्रामसेवक गोविंदा काळे यांनी तातडीने आमची दखल घेतली नाही, तर आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यासकट तक्रार करू. आमच्याकडे याबाबतीचे अनेक पुरावे आहेतं. गरज पडल्यास कोर्टातही जाण्यास मागेपुढे पाहणार नाही."


या नागरीकांनी जमा केले होते 500 -500 रुपये व या सगळ्यांनीचं केलाय  फसवणुकीचा आरोप..

1) विक्रम सदु चव्हाण , 2) इंदल चत्रु जाधव, 3) रणजीत हरी पवार, 4) शेषराव हरी पवार, 5) संतोष केशव चव्हाण, 6) प्रकाश हरी पवार, 7) दुधा बाबु पवार, 8) तुळशिराम बाबु पवार, 9) भादु त्र्यबक चव्हाण, 10) आत्माराम तुकाराम पवार

📢 पंचक्रोशी न्यूजचे आवाहन :

जर तुमच्यासोबतही अशा प्रकारची फसवणूक झालेली असेल तर आमच्याशी संपर्क साधा. जनतेचा हक्क हिरावून घेणाऱ्यांचा भांडाफोड करणे हीच आमची जबाबदारी आहे.


Ad:



टिप्पण्या