बहुलखेडा (सोयगाव) पंचक्रोशीतील बहूलखेडा परिसरात रविवार संध्याकाळच्या वेळेसं दुर्मिळ पण धक्कादायक घटना समोर आली आहे. बहुलखेडा शेत शिवारात तब्बल बारा ते पंधरा फूट लांबीच्या अजगराने एका शेतकऱ्याचा बकरा गिळंकृत केला असल्याचे समोर आले. मात्र अजगराला मोठा शिकार पचवता न आल्याने अजगराचाही काही तासांत मृत्यू झाला.
ज्या शेतकऱ्याचा बकरा गायब झाला होता, त्याने गावकऱ्यांच्या मदतीने अजगर खरोखर मृत असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर अजगराचे पोट फाडून बकरा बाहेर काढण्यात आला.
उपस्थित असलेल्यांनी या प्रसंगाचे मोबाईलवर व्हिडिओ बनवले असून ते सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअँपवर झपाट्याने व्हायरल झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून परिसरात खळबळ माजली आहे.
शेतकरी व जनावरधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे प्रकरण निसर्गात अधूनमधून दिसून येतं.
अजगर मोठा शिकार पकडतो, पण त्याचं पचन खूप हळूहळू होतं. बकरा हे त्याच्या पचवण्याच्या क्षमतेपेक्षा मोठं आणि जड शिकार असतं.
काय होतं अशा वेळी?
अजगर शिकार पूर्णपणे गिळतो, पण पचवताना त्याच्या शरीरावर फार मोठा ताण येतो. मोठ्या जनावरामुळे अजगराच्या आतल्या अवयवांवर दबाव येतो आणि तो श्वास घेण्यात, हालचाल करण्यात असमर्थ होतो. बकराही अजगराच्या शरीरात गुदमरून मरतो.
परिणामी:
बकरा अजगराच्या शरीरात गिळला जातो, पण अजगर ते पचवू शकत नाही. त्यामुळे दोघांचाही मृत्यू होतो.
पचवता न आल्यास अजगर शिकार बाहेर काढण्याचा प्रयत्नही करतो.
याआधी सोशलमिडीयावर असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा