वरसाडे प्र पा (पाचोरा) ग्रामपंचायतने पाच वर्षात मिळालेला 68 लाखाचा निधी खर्च केला. पण काम ?

वरसाडे प्र. पा. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ₹68 लाखांहून अधिक निधी खर्च झालाय. ( फक्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन ) आणि हा पैसा गावासाठी, ग्रामविकासासाठी होता. पण गावाच्या रस्त्यांवर चालताना अजुनही पावसात साचलेलं पाणी, कचऱ्याने भरलेल्या गटारी , रत्याने हगणदारी आणि बरंच तसचं पडलेलं दिसत आहे.

म्हणुनच पंचक्रोशी न्युज जनतेसमोर पुर्ण पाच वर्षाचा तपशील ठेवत आहे.


टीप : या बातमीमध्ये केवळ वरसाडे प्र पा (पाचोरा) ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खर्च करण्यात आलेल्या निधीचा आढावा घेण्यात आलेला आहे. यामध्ये फक्त XV वित्त आयोगाचा निधी आणि ग्रामपंचायतीचे स्वतःचे उत्पन्न (जसे की घरपट्टी, पाणीपट्टी, दंड, इत्यादी) यांचा समावेश आहे.
वरसाडे गावात पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार निधी, खासदार निधी, जल जीवन मिशन, मनरेगा तसेच इतर कोणत्याही शासकीय योजनांच्या माध्यमातून जो निधी मिळालेला आहे, त्याचा या बातमीत समावेश करण्यात आलेला नाही.
(या इतर योजनांमधून मिळालेल्या निधीचा वापर, त्यावर झालेली कामे, आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर सविस्तर अभ्यास करून पंचक्रोशी न्यूज लवकरच स्वतंत्र बातमीच्या रूपात तो तपशील तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेल.)

पारदर्शकतेसाठी ही बातमी आहे... रागासाठी नाही, नागरीकांच्या जागृतीसाठी आहे.

ही बातमी कुणावर टीका करण्यासाठी नाही, किंवा सत्ताधाऱ्यांनी पैसा खाल्ला असावा म्हणुन ही बातमी असाही या बातमी मागचा हेतु नाही. तर गावाच्या भल्यासाठी प्रश्न विचारायलाचं पाहिजे म्हणून ही बातमी आहे. 

जनतेचा पैसा, जनतेच्या समोरच हिशोब मांडला पाहिजे.
ज्यांनी काम केलं, त्यांचा गौरव व्हावा.
पण ज्यांनी केवळ नावापुरतं ‘विकास’ केला, त्यांनी उत्तर द्यायलाच हवी.. 

म्हणुन ही बातमी...

तर चला सुरवात करुया...

सुरवात करण्याआधी महत्वाची टीप: बातमीमध्ये प्रकाशित नावे व रक्कम शासकीय संकेतस्थळावरुन घेतलेली आहे.

 (सविस्तर  तपशील न वाचता आल्यास फोटो वर क्लिक करा व झुम करुन वाचा )

आर्थीक वर्ष 2021-2022



आर्थीक वर्ष 2021-2022 मध्ये वित्त आयोगाचा पैसाचं खर्च झालेला नाही. नवनियुक्त सरपंच व सदस्य निवडीनंतर बँकींग प्रक्रिया व इतर प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी भरपुर वेळ लागलेला असावा. किंवा निधीचं उपलब्ध नसावा. पण घरपट्टी, पाणीपट्टी वगैरे जमा करुन निधी खर्च केलेला आहे. यामध्ये ZXY हे कोणत्या पद्धतीचे काम आहे हे ग्रामपंचायतचे त्यावेळेस पदावर असलेल्यांनी द्यायला हवे.

2022-2023


2022-2023 मध्ये Sarud construction या ठेकेदाराला अंगणवाडी दुरुस्तीचं काम देण्यात आलं होतं. पण याच ठेकेदाराच्या नावाने 133778 रुपयाचा व्यवहार झालेला आहे Handwash खरेदी / वाटप केल्याबद्दल.. आणि पंचक्रोशी टीमने गावात विचारणा केल्यानंतर एकाही व्यक्तीने कोरोनाकाळात हँडवाँश वाटप झाले होते अस सांगितलेलं नाही. ना कुठे बातमी आहे. ना फोटो ? त्यामुळे अंगणवाडीची तरी खरोखर दुरुस्ती त्या कालावधीत झाली होती का ? या ठेकेदाराच्या माध्यमातुन झालेल्या इतर सर्व कामाची पडताळणी करायला हवी? व यांना काम देणाऱ्या त्याकाळात पदावर असलेल्यांची चौकशी व्हायला हवी.  हे गंभीर प्रकरण आहे.

तसेचं उषाकाँल कन्ट्रक्शनच्या माध्यमातुन व्यवहार झाला पण कोणत्या कामासाठी याचाही सविस्तर उल्लेख संकेतस्थळावर उपलब्ध नाही.

own resorses मधुन 313850 रुपये खर्च करुन झे पी शाळेची भिंत बांधण्यात आलेली आहे. खरचं इतका पैसा खर्च झाला असावा ? वकिल फी म्हणजे काय ? नेमकं कोणत्या कामाची फी वकिलाला दिल्या गेली ?

आजही गावातीलं कित्येक खाबांवर LED लाईट नाही. अनेक खाबांवर बसवलेले LED बंद पडलेत. अनेक खाबांवर 100-150 रुपयाला मिळणारे LED बल्प बसवलेले आहेतं..
2022- 2023 मध्ये दोन-अडीच लाख रुपयाचे काम ज्या Niramayee  Entrprises या कंपनीला / ठेकेदाराला दिले त्या ठेकेदाराकडून ग्रामपंचायतने LED लाईटसाठी वाँरटी वगैरे घेतलेली नव्हती का ? पुन्हा 2025-2026 मध्ये LED लाईटसाठीचं लाखो रुपये खर्च झाल्याचे निदर्शनास येत आहे. आणि तरीही गावात अनेक खाबांवर लाईटचं नाही. त्यामुळे ग्रामपंचायतच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे. 

2023-2024

2023-2024 मध्ये 1618822 ( अक्षरी : सोळा लाख, अठरा हजार,आठशे बावीस रुपये ) रुपयाचा व्यवहार झाला पण शासनाच्या संकेतस्थळावर फक्त ठेकेदारांची नाव दिसत आहे. पण त्या ठेकेदारांनी किती काम केली व कोणती काम केली ( किती मीटर लांबीचा रस्ता बनवला किंवा गटार बनवली किंवा इतर कामे केली याची सविस्तर माहिती नागरीकांसाठी उपलब्ध करुन दिली पाहिजे ) सगळी माहिती सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचली पाहिजे. ग्रामपंचायतने येणाऱ्या ग्रामसभेत किंवा प्रसिद्धीपत्रक  काढून  सविस्तर माहिती उपलब्ध करुन  द्यावी अशी मागणी नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे.

2024-2025


 2024-2025 या आर्थीक वर्षात सर्वाधिक खर्च...
भुमिगत गटारावर सर्वाधिक खर्च...
पेवर ब्लाकवर खर्च...
अंगणवाडी साहित्य...

शेतकरी प्रशिक्षणावर 99500 रुपये खर्च झालेलं बघायला मिळत आहे. पण खरंच गावातीलं शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं होत ? काही पुरावा, फोटो , बातम्या उपलब्ध आहे ? गावातील नागरीक म्हणतं आहे की, आम्हाला तर माहितीचं नाही..

2025-2026 हे आर्थीक वर्ष अजुनही सुरुच आहे. आतापर्यंत या आर्थीक वर्षात 5 लाख रुपयांपर्यंतचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. संपुर्ण आर्थीक वर्ष किंवा ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपल्यानंतर या वर्षाचा सविस्तर तपशील वाचकांसाठी उपलब्ध केला जाईलं.

सगळा खर्च व बातमी वाचली असेलं आणि तुम्ही वरसाडे ग्रामपंचायतीचे नागरीक असालं तर पंचक्रोशी न्युजला ला कमेंट करुन सांगा.. ग्रामपंचायतच्या कामकाजावर खुश आहात का ? पंचक्रोशी न्युजने मोजके प्रश्न उपस्थित केले पण तुम्हाला संपुर्ण तपशील वाचल्यानंतर  कोणकोणते व्यवहार संशयास्पद वाटले ? 

पंचक्रोशी न्युजला अनेक प्रश्न पडलेत. 
पण वाचकांनी सांगावे की, तुम्हाला कोणकोणते प्रश्न पडले ? 
खरचं जितका खर्च दाखवलाय तितका खर्च झाला असेल का ? तुम्हाला काय वाटत आम्हाला कमेंट करुन कळवा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा आम्ही तुमच्या प्रतिक्रियेवर बातमी बनवुन प्रश्न विचारत राहू..

विलास 

panchkroshi news

varsade pra pa

टिप्पण्या

  1. २४-२५ मध्ये जास्त काम केलं आहे असं वाटतं, नंतर संधी मिळेल की नाही म्हणून.पण जेवढं दाखवलं आहे तसं काहीच नाही आहे गावात."

    उत्तर द्याहटवा
  2. शासनाकडून गावाच्या विकासासाठी ६८ लाख रुपये मंजूर झाले, पण ग्रामपंचायतीने फक्त कागदावरच रकमेचं वितरण केल्याचं दिसतं. गावात कुठलाही बदल किंवा सुधारणा दिसत नाही. पारदर्शकता आणि जबाबदारी खूप गरजेची आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा