वरसाडे प्र पा ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश , वाढीव पोल बसविण्याचे काम सुरू

वरसाडे प्र पा : वरसाडे प्र पा ग्रामपंचायतीच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळाले असून गावात वाढीव पोल बसविण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. या उपक्रमामुळे गावातील अनेक कुटुंबांना वीज कनेक्शन मिळविणे सोपे होणार असून रात्रीच्या वेळी गाव उजळून निघणार आहे.


सुमारे तीन महिन्यांपूर्वी माजी जि. प. सदस्य मधुमाऊ काटे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सुरेखा पवन पवार, ग्रामविकासासाठी सतत झटणारे सरपंचपती पवन पवार, उपसरपंच विनायक राठोड व ग्रामपंचायत सदस्य बंन्टी राठोड , प्रकाश जाधव यांनी विद्युत महावितरण कंपनीकडे वाढीव पोल उपलब्ध करून देण्याबाबत ठोस मागणी केली होती.



मादी जि. प. सदस्य काटे यांनी या मागणीचा वेळोवेळी पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.


आज प्रत्यक्ष पोल गावात येऊन बसविण्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पोलवर बसणाऱ्या लाईटमुळे अंधारलेल्या रस्त्यांना प्रकाश मिळेल. त्यामुळे रात्री गावकऱ्यांना सहजपणे ये-जा करणे सोपे होईल. शिवाय शेतकरी व विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.


गावातील रहिवासी विनोद चव्हाण यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "ग्रामपंचायतीने केलेल्या प्रयत्नांसाठी आम्ही सर्वजण आभारी आहोत.” आजवर रात्री अंधारामुळे ये-जा करताना मोठी अडचण होत होती. भीती कायम वाटायची. आता नविन पोलावर सुद्धा LED लाईन लावावे. गाव उजळल्यामुळे सुरक्षितता वाढेल. 


या कामाचे ग्रामस्थांनी स्वागत करून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व माजी जि. प. सदस्य यांचे आभार मानले आहेत.


टिप्पण्या