अतीवृष्टीग्रस्त वरसाडे प्र पा गावात पंचनामे तातडीने पूर्ण; प्रशासनाच्या तत्परतेचे शेतकरी ग्रामस्थांकडून कौतुक
वरसाडे ता. पाचोरा येथे झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांची उभी पिके पाण्याखाली गेली असून, काहींची घरे पडल्याच्या घटना घडल्या. या आपत्तीची तातडीने दखल घेऊन महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावात धाव घेत पंचनाम्यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केली.
सहाय्यक कृषी अधिकारी चौधरी साहेब, तलाठी आप्पा, पोलीस पाटील राजाराम राठोड, सरपंचपती पवन पवार, उपसरपंच विनायक राठोड तसेच ग्रामपंचायत सदस्य बंन्टी राठोड यांच्या उपस्थितीत गावातील शेतमाल व पडलेल्या घरांचे पंचनामे करण्यात आले. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतात व घरांमध्ये जाऊन नुकसानीचा आढावा घेतला.
पावसामुळे चिखल व अडचणी असूनही पथकाने शेतांमध्ये उतरून प्रामाणिकपणे पंचनामे केले. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून, गावकऱ्यांनी प्रशासनाच्या या तत्परतेचे मनापासून कौतुक केले.
गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले की, "आपत्तीच्या काळात प्रशासन व ग्रामपंचायत एकत्र येऊन मदतीसाठी उभे राहिले, त्यामुळे आम्हाला मोठा आधार मिळाला."






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा