वरसाडे गावातील युवा तरुणांचा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास – शिवसेनेत जाहीर प्रवेश

 पाचोरा : वरसाडे गावातील अनेक तरुणांनी आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे पाचोरा तालुक्यात शिवसेनेला ग्रामीण भागातून नवी उर्जा व बळ मिळाले आहे.


अलीकडेच दोन दिवसापुर्वी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी वरसाडे गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला होता. या भेटीदरम्यान त्यांनी गावातील तरुणांना मार्गदर्शन केले. “गावाचा, राज्याचा आणि देशाचा विकास साधायचा असेल तर तरुणांनी राजकारणात सक्रीय राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन आमदार पाटील यांनी केले. त्यांच्या या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन गावातील तरुणांनी पाचोरा येथे आमदार पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.


या कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख किशोर बारवकर, जेष्ठ नेते शालिग्राम मालकर, तालुका प्रमुख नितीन तावडे, वरसाडे येथील शिवसेना पिंपळगाव शिंदाड गटाचे विभाग प्रमुख आनंदा राठोड , प्रविण राठोड यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रवेश सोहळ्यानंतर नव्याने प्रवेश केलेल्या नागरिकांनी गावोगाव शिवसेना बळकट करण्याचा संकल्प केला.


या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद केवळ वरसाडेच नव्हे तर संपूर्ण पाचोरा तालुक्यात वाढली असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांवर त्याचा थेट परिणाम दिसून येईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर तरुणांचा उत्साह आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे पक्षाच्या कार्यात गती येणार असल्याचे मतही व्यक्त होत आहे.

Ad


टिप्पण्या