वरसाडे प्र पा गावकऱ्यांचा आक्रोश : फिल्टर बंद, विहिरीत TCL नाही; स्वच्छ पाण्याअभावी लोक आजारी..

वरसाडे प्र पा ( पाचोरा ) वरसाडे तांडा येथे पत्र्याच्या शेडमध्ये पंचायत समितीकडून अडीच वर्षापुर्वी ३.२५ लाख रुपये खर्चून बसवलेलं फिल्टर मशीन गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. सुरुवातीला काही दिवस लोकांना याचा फायदा झाला, मात्र खुपचं कमी कालावधीत नंतर देखभाल न झाल्याने फिल्टर मशीन बंद अवस्थेत पडलेली असुन फिल्टर परीसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे.

325000 रुपये खर्च करुन बसलेले फिल्टर मशिन

दरम्यान, गावाच्या पाणीपुरवठा विहिरीत कित्येक दिवसांपासून TCL पावडर टाकलेली नाही, अशी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परिणामी, दूषित पाणी पिण्यामुळे गावातील अनेकजण मोठ्या प्रमाणावर आजारी पडले आहेत. हलगर्जीपणा केल्याबद्दल पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना याबाबत नोटीस बजावण्याचे आदेश पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना दिले आहे.


जवळचं पिंपळगाव हरेश्वर  येथीलं स्थानिक रुग्णालये रुग्णांनी फुल्ल भरली असून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, “जर फिल्टर मशीन सुरु असतं आणि विहिरीत वेळोवेळी क्लोरीन पावडर टाकली गेली असती, तर इतके लोक आजारी पडले नसते.”


तरुण वर्गातून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, गावाचा मौल्यवान निधी वाया गेला, आणि जबाबदार अधिकारी व लोकप्रतिनिधी बेफिकीर आहेत, अशी जोरदार टीका तरुणांकडून होत आहे...





टिप्पण्या