कसळाबाई शंकर पवार प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा येथे पार पडला शिक्षक-पालक मेळावा..

वरसाडे तांडा (पाचोरा) येथील आश्रम शाळेत दि.30 सप्टेंबर रोजी मंगळवारी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच शिस्त, स्वच्छता, उपस्थिती आणि गुणवत्तावाढ या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.




कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौली येथील विद्यार्थी पालक प्रतिनिधी श्री बाजीराव केंडे  होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वती माता व कै वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन केले गेले व उपस्थित पालकांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.



माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.साईदास राठोड सर यांच्याकडून प्रास्ताविक करण्यात आले. प्रास्ताविक मांडतांना श्री.राठोड सरांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पालकांनी घरी अभ्यासाचे वातावरण निर्माण करण्याचे, विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठविण्याचे, मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवण्याचे आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. तर पर्यवेक्षक श्री. मालकर सर यांनी अभ्यासात मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्याबाबत पालकांना सूचना दिल्या. 



प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. सतिष राठोड सर, पर्यवेक्षक मालकर सर, श्री.परशुराम पवार सर, श्री.सजंय पाटीलं सर, श्री.अनिल महाजन सर, श्री चारु राठोड सर, श्री. सुधाकर गिते सर, श्री.मृत्यूंजय शहा सर यांनी प्रत्यक्ष पालकांसोबत भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली..


पालकांनीही शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. पालकांकडून श्री. शेषराव राठोड व श्री. भाईदास राठोड यांनी मत मांडतांना सांगितले की, शिक्षकांनी मुलांना रोज गृहपाठ द्यावा व रोज गृहपाठ तपासावा,  तसेच टँब देण्यापेक्षा शाळेतीलं कँम्पुटरची संख्या वाढवली जावी व मुलांना किमान रोज एक तास कँम्पुटरवर बसवले जावे. शाळेत शिक्षकांकडे प्रोजेक्टर असावे जेणेकरुन शिक्षकांना डिजीटल शिक्षण देता येईलं. मुलांना डिजीटल माध्यमातुन दिलेलं शिक्षण लवकर समजतं व आवड निर्माण होते. शिक्षकांनी शाळेला अशा जास्तीत जास्त आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी संस्थेसोबत चर्चा करावी व अजुन चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी पालकांनी केली.


प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. सतिष राठोड सर यांनी पालक मेळावा घेणे का महत्त्वाचे आहे ? व पालकांनी या मेळाव्याला उपस्थित राहणे का गरजेचे आहे ? यावर उपस्थित पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  शिक्षक व पालक यांचा संवाद वाढवण्यासाठी, मुलांच्या अडचणी ओळखून योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा सभा उपयुक्त ठरतात. शाळा–घर यांच्यातील दुवा दृढ झाला तर विद्यार्थ्यांची प्रगती जलद गतीने होते


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.धंजे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन  श्री.सजंय पाटीलं सर यांनी केले.

या शिक्षक-पालक सभेला कवली येथील विद्यार्थी पालक श्री.मंगेश तराळ, बाजीराव केंडे, वरसाडे तांडा येथीलं मिश्रीलाल चव्हाण, आत्माराम चव्हाण , जितेंद्र राठोड, दिलीप गुजर, आत्माराम राठोड, शेषराव राठोड, पुनमचंद राठोड, भाईदास राठोड, ईश्वर राठोड, सुनीता गायकवाड, अनिता पवार तसेचं वरसाडे तांडा सहीत कवली , बहुलखेडा, वडगाव कडे, घोसला, निबांयती, तिखी , उमरविहीरे येथीलं पालक उपस्थित होते.

पालक मेळाव्यामुळे शाळा आणि पालक यांच्यातील नातं अधिक दृढ झाल्याचे समाधान सर्वांनी व्यक्त केले.

टिप्पण्या