बाबा रामदेवजी भंडारा वरसाडे येथे भक्तिभावाने पार... आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यासह अनेकांच्या भेटी;

आज भाद्रपद शुक्ल एकादशी (ग्यारस) निमित्त वरसाडे तांडा  येथे बाबा रामदेवजीचा भंडारा भक्तीभावात पार पडला. सकाळी लवकर पालखी मिरवणुकीने उत्सवाची सुरुवात झाली. मिरवणुकीदरम्यान हलकासा पाऊस होता तरीही तांड्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी मिरवणुकीतं सहभाग घेतला. 



 

या प्रसंगी आमदार श्री. किशोरआप्पा पाटील यांनी गावाला भेट दिली. मंदिरात प्रवेश करून बाबा रामदेवजींचे आशिर्वाद घेतले. लोकांना मार्गदर्शन केले. तीनही तांड्यातील नागरीकांकडुन  आमदार किशोरआप्पा पाटील यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार केला गेला.

 

त्यानंतर गावातील नेत्यांनी आमदारांना दोन महत्त्वाची निवेदने दिली.

1. शेजारी जिल्ह्यात शेती असलेल्या शेतकऱ्यांना पोखरा योजनेचा लाभ मिळत नाही, तो मिळावा.

2. वरसाडे गावातुन एसटी बसच्या फेऱ्या वाढवाव्यात या संदर्भात गावातील नागरिकांनी आमदारांना निवेदन दिले.

 

आमदारांनी या मागण्यांचा पाठपुरावा करून लवकरात लवकर गावकऱ्यांचे समाधान करण्याचे आश्वासन दिले आहे.

या भंडाऱ्याला पिंपळगाव हरेश्वर पंचक्रोशीतील नेते श्री. उद्धव मराठे, श्री.शालिग्राम मालकर, श्री. रवि गिते, श्री. बाळूदादा बडगुजर, श्री अजय तेली, श्री पद्माकर बडगुजर व अनेक नेत्यांनी- सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली व बाबा रामदेवजींचे आशिर्वाद घेतले. 


भंडाऱ्याच्या आयोजनात गावातील तरुणाई, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहकार्य केले. हलक्या पावसातही भाविकांचा उत्साह कमी झाला नाही, उलट श्रद्धा व भक्तीची उर्जा अधिकच वाढली.

    
 

या संपुर्ण नियोजनात गावातील सरपंच श्री पवन पवार, उपसरपंच श्री विनायक राठोड जेष्ठ नेते व श्री. विजय राठोड, श्री. शिवदास राठोड,  श्री. शिवदास ताराचंद राठोड,  श्री बाबुलाल चव्हाण. श्री. आण्णा राठोड, श्री.अर्जुन राठोड, श्री.पोपट राठोड, श्री.चारु राठोड सर, पोलीस पाटील श्री.राजाराम राठोड, श्री.नितीन चव्हाण, श्री. आनंदा राठोड , श्री.बंन्टी राठोड, श्री.नानु चव्हाण व तीनही तांड्यातील सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

 

रात्रीपासुन गावात भजन - गीत, भक्तांची गर्दी आणि सामूहिक भोजनामुळे गावातीलं वातावरण भक्तीमय झाले होते.

आज रात्रीही वरसाडे गावात भजनाची मैफील रंगणार आहे. 

टिप्पण्या