पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्र. ३ येथे ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत अखेर वित्त आयोगाच्या निधीतुन काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला. या कामामुळे नागरिकांना चिखल, धूळ आणि खड्ड्यांच्या त्रासातून मोठा दिलासा मिळणार आहे. घरासमोर कोणतेही वाहन आणतांना होणारा त्रास आता होणार नाहीये.
विकास धर्मा राठोड ते ईश्वर चव्हाण याच्यांघरापर्यंत काँक्रेटीकरण करणे या कामाचा शुभारंभ वरसाडे तांडा क्रं 3 येथीलं जेष्ठ नागरीक श्री. राजाराम पवार, श्री.रंगलाल राठोड, श्री.रणजित चव्हाण, श्री.बाबूलाल चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व पूजन विधी करून भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी सरपंचपती पवन पवार, उपसरपंच विनायक राठोड, ग्रामपंचायत सदस्य बंन्टी राठोड, पोलीस पाटील राजाराम राठोड तसेच गावातील नागरीक श्री.युवराज नवले, श्री. प्रेमदास पवार, श्री.धना राठोड, श्री.कांतीलाल पवार, उद्योजक श्री. प्रेमदास पवार, श्री.मकराम राठोड , तंटामुक्ती अध्यक्ष श्री.प्रविण व स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक गल्लीतीलं नागरिकांनी सांगितले की, पावसाळ्यात रस्त्यावर चिखलामुळे मोठा त्रास होत असे. शाळेत जाणाऱ्या मुलांना, शेतमाल बाजारात नेणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच रुग्णवाहिकेला देखील अनेकदा अडचणी निर्माण होत असत. काँक्रीट रस्ता झाल्याने या गल्लीतील या सर्व समस्यांना आता पूर्णविराम मिळणार आहे.
![]() |
रस्ता पुर्ण झाल्यानंतर सरपंचपती यांचा रत्यासोबतचा सेल्फी.. |
कार्यक्रमस्थळी सरपंचपती पवन पवार म्हणाले की, “ग्रामपंचायत नेहमी विकासकामासाठी तत्पर आहे. गावात अजूनही काही मूलभूत सुविधा उभ्या राहणे बाकी आहे. एकत्रितपणे प्रयत्न करून त्या लवकरच पूर्ण करू.”
ग्रामस्थांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले व गावाच्या प्रगतीसाठी प्रशासन व ग्रामपंचायतीने यापुढेही अशाच विकासकामांना गती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा