वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासोबत वरसाडे गावातीलं तरुण कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश..

पाचोरा तालुक्यातील नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांचा आज मुबंईत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश सोहळा आयोजित केला होता. 


वैशाली सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली गावातीलं अनेक तरुणांनी मुबंईत हजेरी लावुन भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला.




या प्रवेशामुळे भाजप पक्षाला तालुक्यातीलं युवाशक्तीचं पाठबळ मिळणार आहे.  हा सोहळा म्हणजे भविष्यात धनुष्यबाण ऐवजी तालुक्यात कमळचं फुलणार असल्याची नांदी आहे.


आजघडीला ग्रामीण भागातील विकास, रोजगाराच्या संधी व स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचं सक्षम असल्याचा विश्वास या सर्व तरुणांना वाटत असल्याचे त्यांनी सांगितलं.




या सोहळ्यात माजी जिल्हा परीषद सदस्य श्री. मधुभाऊ काटे , डाँ श्री शांतीलाल तेली, वरसाडे गावातील वैशालीताई यांचे समर्थक अमोल राठोड, सरपंच पती पवन पवार , उपसरपंच विनायक राठोड, ग्रामपंचायत सदस्य बंन्टी राठोड , बाबुलाल चव्हाण, प्रकाश जाधव, युवा कार्यकर्ता गोपाल चव्हाण सहीत अनेक स्थानिक नेते व तरुणांनी आज मुंबईत औपचारिकरित्या कार्यक्रमाला हजेरी लावली व प्रवेश केला.



वरसाडे गावातील तरुणांच्या या प्रवेशामुळे गावातीलं राजकीय समीकरणांना वेगळी दिशा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

panchkroshi news

varsade pra pa


टिप्पण्या