कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव संचालकपदी शालिग्राम ओंकार मालकर यांची बिनविरोध निवड

पाचोरा  :

पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी शालिग्राम ओंकार मालकर यांची बिनविरोध निवड झाली असून, त्यांच्या निवडीबद्दल कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सत्कार करण्यात आला.


या प्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपण शेतकरी वर्गाच्या प्रश्नांवर नेहमीच ठाम पवित्रा घेतल्याचे सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचे केंद्र असून संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अधिकाधिक पारदर्शक आणि नवनवीन योजना राबवाव्यात, असेही ते म्हणाले.

सत्कार समारंभाला शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृऊबा सभापती गणेश पाटील, उपसभापती प्रकाश पाटील, संचालक प्रकाश तांबे, विजय पाटील, सुनील पाटील, राहुल पाटील, लखीचंद पाटील, शिवसेनेचे प्रवीण ब्राह्मने, सुनील पाटील, योगेश पाटील, राजे पाटील, सचिव बोरुडे साहेब, सरपंच संतोष परदेशीं, संजू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते मालकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शालिग्राम ओंकार मालकर यांनी निवडीनंतर पंचक्रोशी न्युज पोर्टल सोबत बोलतांना सांगितले की, "शेतकरी हित हाच माझा केंद्रबिंदू असेल. शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, पारदर्शक व्यवहार व्हावा आणि बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना नवनवीन सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन."

उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून मालकर यांच्या निवडीचे स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

पाचोरा-भडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी देखील मालकर यांच्या बिनविरोध निवडीचे स्वागत करत अभिनंदनाचा वर्षाव केला.

टिप्पण्या