पिंपळगाव हरेश्वर – वरसाडे -सोयगाव पंचक्रोशीत अखेर पावसाची बरसात, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर

पावसाळा सुरु होऊन बरेच दिवस उलटून गेले. मध्ये अनेकदा

आकाश ढगाळलं, पंरतु परीसरात मुसळधार पाऊस पडला नव्हता. धरणं, बंधारे, ओढे नद्या सगळं कोरडं पडलं होतं. शेतातल्या पिकांची वाढ थांबली होती. उभ्या पिकांकडे पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात चिंता दाटून येत होती. "यावर्षी काय होईल?" हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता.




मात्र काल अखेर आभाळ दाटलं, विजांचा कडकडाट झाला आणि रात्रभर मुसळधार पावसाने जळगाव जिल्ह्यासह पंचक्रोशीत हजेरी लावली. पत्रांवर वाजणारा पावसाचा आवाज जणू आशेची गाणी गात होता. शेतकरी रात्रभर झोपू शकला नाही, पण ही जागरणं होती आनंदाची, सुखाची.


आज सकाळी शेतात पावसाचे पाणी साचलेले पाहून शेतकऱ्याच्या मनात नवा उत्साह जागा झाला. जणू कोरड्या जमिनीला जीवदान मिळालं. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. पिकं पुन्हा जोमाने उभी राहतील, ही खात्री त्यांना मिळाली आहे.


पाऊस फक्त जमिनीला नव्हे तर शेतकऱ्यांच्या मनालाही तृप्त करून गेला आहे.




 कालांतराने पुन्हा असाच जोरदार पाऊस पडला तरचं पंचक्रोशी मधील धरण पुर्ण भरतीलं. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा जोरदार पाऊस पडायला हवा यासाठी पंचक्रोशीतली जनता देवाकडे साकडे घालतं आहे.






टिप्पण्या