वरसाडे प्र पा (पाचोरा) या छोट्याश्या गावातीलं शोभा ग्रुप ऑफ फूड इंडस्ट्रीजच्या दोन भावांची यशोगाथा..
अतिशय छोट्या गावात, आर्थिकदृष्ट्या साधारण परिस्थितीत वाढलेल्या राहुल प्रेमदास चव्हाण आणि अरविंद प्रेमदास चव्हाण या दोन भावांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने यशाचा नवा अध्याय लिहिला आहे.
राहुल यांनी BE Electrical पदवी पूर्ण केली आणि दोन वर्षे पुण्यात Research Analyst म्हणून काम केले. अरविंद यांनी B.Tech (Food Technology) चे शिक्षण घेतले आणि काहीकाळ नोकरी केली. चांगल्या पगाराच्या नोकऱ्या असूनही, या दोघांनी कायमस्वरूपी नोकरीत रमण्याऐवजी गावातच काहीतरी स्वतःचे करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी मिळून शोभा ग्रुप ऑफ फूड इंडस्ट्रीज ची स्थापना केली.
सुरुवातीला छोट्या प्रमाणात चिप्स, कुरकुरे नमकीन यांसारख्या स्नॅक्सची निर्मिती सुरू केली. व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी दिवसरात्र कष्ट घेतले, स्वतः बाजारात फिरून छोट्या दुकानांपासून ते मोठ्या डीलरपर्यंत मार्केटिंग केले.
हळूहळू त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळू लागला आणि त्यांचा व्यवसाय वाढू लागला. आज त्यांच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 20 ते 22 लाख रुपये इतका आहे.
या क्षेत्रात आधीपासूनच करोडो रुपयांचा टर्नओव्हर असलेल्या नामांकित कंपन्या असताना, त्यांच्यात टिकून राहणे आणि बाजारात आपली ओळख निर्माण करणे सोपे नव्हते. मात्र, अवघ्या 25 ते 30 वर्षांच्या वयात या दोघांनीही ते शक्य करून दाखवले.
त्यांची कहाणी हे दाखवते की योग्य शिक्षण, स्पष्ट उद्दिष्ट, मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर मोठे यश मिळवणे शक्य आहे – मग आपण कुठल्याही छोट्या गावातून आलो असलो तरीही...
आजच्या स्पर्धात्मक काळात, चांगली नोकरी मिळाल्यानंतरही अनेक तरुण शहरातच स्थायिक होण्याचा विचार करतात. पण राहुल आणि अरविंद यांनी मात्र गावात राहून व्यवसाय करण्याचा मार्ग निवडला. सुरुवातीला अडचणी आल्या, बाजारात मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागली, पण त्यांनी हार मानली नाही.
त्यांची कथा हेच सांगते की –
"संधी शोधायची नसते, ती निर्माण करायची असते."
गावातही भरपूर संधी आहेत, फक्त त्या ओळखून मेहनतीने काम करण्याची तयारी हवी. इतर तरुणांनीही या दोन भावांकडून प्रेरणा घेत, आपल्या गावात किंवा परिसरात स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे स्वतःच्या उन्नतीसोबतच गावाचा आर्थिक विकास होईल.
panchkroshi news
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा