पाचोरा (जळगाव) :
वरसाडे गावातील सुशिक्षित आणि समाजकार्यासाठी तत्पर असलेल्यांना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात चालणाऱ्या शिवसेनेत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्हा प्रमुख (शिवसेना, जळगाव) रावसाहेब मनोहर गिरधर पाटील यांच्या उपस्थितीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून ही जबाबदारी देण्यात आली. या नियुक्तीनंतर गावात आणि तालुक्यात शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आनंद विजय राठोड (सिव्हिल इंजिनिअर) यांची पिंपळगाव-शिंदाड जिप गट शिवसेना विभाग प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
आनंद राठोड हे सिव्हिल इंजिनिअर असून, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच तरुणांमध्ये संघटन कौशल्य आणि इंजिनीअर असल्यामुळे त्यांच्याकडे विकासाभिमुख दृष्टीकोन आहे. झटपट निर्णय घेण्यांची क्षमता त्यांच्याकडे आहे अस गावातीलं तरुणांचे मत आहे.
डाँ नितीन चव्हाण यांची शिवसेना उपतालुका संघटक पिंपळगाव-शिंदाड झेडपी गटपदी नियुक्ती झाली असून,
डॉ. नितीन चव्हाण हे वैद्यकीय क्षेत्रातील सुशिक्षित व्यक्तिमत्त्व असून, सामाजिक आरोग्यविषयक कार्यातही त्यांचा नेहमी पुढाकार असतो. दोघेही आपल्या-आपल्या वार्डात अग्रेसर असून, विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आले आहेत. गावातील तरुणांना दिशा देणे, विकासात्मक कामांमध्ये सहभाग घेणे आणि शिवसेनेची विचारधारा घराघरात पोहचवणे, या गोष्टींसाठी त्यांचे योगदान विशेष राहिले आहे.
“गावातील सुशिक्षित आणि कार्यक्षम तरुणांना जबाबदारी दिल्यामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होणार आहे. समाजातील विविध समस्यांचे निराकरण करून विकास साधण्यासाठी ही पावले उपयुक्त ठरतील,” अशा भावना व्यक्त होत आहेत.
शिवसेना जिल्हा प्रमुखांनी सांगितले की, “सुशिक्षित तरुणच भविष्यात राजकारणात सकारात्मक बदल घडवू शकतात. डॉ. नितीन चव्हाण व आनंद राठोड यांच्या माध्यमातून पक्ष संघटन नक्कीच बळकट होईल, असा मला विश्वास आहे.”
या नियुक्तीनंतर गावातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
Varsade pra pa
panchkroshi news
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा