"पप्पूपासून 'पॉप्युलर नेता' पर्यंत: तरुणांच्या मोबाइल स्क्रीनवर राहुल गांधींचा जलवा!

एक काळ होता, जेंव्हा भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींना "पप्पू" म्हणून देशभरात प्रचार केला. सोशल मीडियावर आणि निवडणुकीच्या सभांमध्ये त्यांच्यावर टीका करण्यात आली, आणि अनेक तरुणांच्या मनात राहुल गांधींची प्रतिमा "अक्कल नाही" अशा पद्धतीने तयार झाली.




त्यांची प्रतिमा आणखी खराब करण्यासाठी त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ कापून-छाटून पसरवले गेले. "आलू पासून सोना काढू" यांसारखे अर्धवट क्लिप्स व्हायरल करून त्यांना हसवणुकीचा विषय बनवण्यात आला. पण राजकीय वारसा लाभलेला हिरा शेवटी उजळून निघणारच ना !


आजच्या सोशल मीडिया युगात परिस्थिती पूर्णपणे उलटली आहे. व्हॉट्सअँप ग्रुप, इन्स्टाग्राम रिल्स, युट्यूब व्हिडिओ जिथे बघा तिथे राहुल गांधींची उपस्थिती आहे. त्यांच्या भाषणांचे, संवादांचे, आणि प्रवासातील दृश्यांचे व्हिडिओ लाखो-करोडो व्ह्यूज मिळवत आहेत.



तरुण पिढी केवळ बघत नाही, तर शेअर करत आहे, प्रतिक्रिया देत आहे, आणि अनेकदा त्यांच्या विचारांशी जोडली जात आहे. ‘पप्पू’ ही टॅगलाईन आता इतिहासजमा झाली असून, राहुल गांधींची नवी ओळख स्पष्ट बोलणारा, लोकांमध्ये मिसळणारा, आणि जनतेच्या प्रश्नांना भिडणारा नेता तरुणाईच्या मनात ठसत आहे.


राजकारणात प्रतिमा कशी बदलते आणि सोशल मीडियाच्या लाटेवर कोण कसा स्वार होतो, याचं हे ताजं आणि थक्क करणारं उदाहरण आहे. एका काळी जो मीमचा विषय होता, तोच आज लाखोंच्या स्क्रीनवर ‘आयकॉन’ बनून झळकत आहे.



टिप्पण्या