पाचोरा-भडगाव विधानसभा : मतदारसंघात विरोधक संपले ? सगळेच प्रमुख नेते सत्ताधारी गटात सामील..

पाचोरा भडगाव मतदारसंघातीलं हेच ते प्रमुख नेते जे काही महिन्या आधीपर्यंत 2024 विधानसभा निवडणुक  एकमेकांच्या विरोधात लढले. निवडणुकीत करोडो रुपये खर्च केले. अनेक नेत्याचे रोड शो झाले,  सभा झाल्या, आरोप प्रत्यारोप झाले, मी निष्ठावांत , मी कट्टर  बोलुन झाले आणि एक वर्षाच्या आत सगळे एकत्र झाले



काही महिन्यातचं पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय समीकरणे पूर्णपणे पालटलेली दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासुन विरोधकांची ताकद हळूहळू कमी होत गेली आणि भाजप-शिवसेना शिंदे युतीसमोर त्यांचा सामना करण्यास कुणी उरलं आहे का ? हा प्रश्न आता गंभीरतेने उपस्थित होत आहे.


दिलीप वाघ (माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश केवळ एका नेत्याचा नसतोच, तर स्थानिक पातळीवरील छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांचा मोठा ओघही यामागे जोडला गेलेला असतो.


 वैशालीताई सुर्यवंशी (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या शिवसेना फुटीनंतर अचानक प्रकाश झोतात आल्या. भावाविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर त्यांनी लढाई सुरू ठेवण्याऐवजी आता भाजपमध्ये प्रवेश करून विरोधकांच्या गोटात जाणे पसंद केले आणि विरोधात आणखी एक मोठी पोकळी निर्माण केली.


अमोल शिंदे मतदारसंघातील मागच्या काही वर्षांपासूनचा महत्त्वाचा राजकीय चेहरा. पण त्यांचा राजकीय प्रवास हा जणू एसटी बसच्या फलकपाटीसारखा झालाय –

भाजपा → अपक्ष → भाजपा →

 पुन्हा 

भाजपा → अपक्ष → भाजपा 


याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरीलं अनेक प्रभावी नेते एकतर थेट भाजपमध्ये किंवा शिवसेना-शिंदे गटात दाखल झाले आहेत. या घडामोडींमुळे मतदारसंघातीलं तळागाळातील कार्यकर्त्यांचे सघंटन आणि शक्ती युतीकडे ओढली जात असल्याचे स्पष्ट दिसते


( आता थोड प्लँशबँक मध्ये जाऊया म्हणजे भविष्यातीलं मतदारसंघाचा राजकारणाचा अंदाज कळेलं )

अमोल शिंदे भाजपाचे तालुकाध्यक्ष होते. २०१९ मध्ये त्यांनी युतीविरुद्ध बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली. अर्थात, एकहाती सत्ता मिळावी आणि शिवसेनेचा पत्ता कट करावा या उद्देशानेच भाजपाने त्यांना बंडखोरीसाठी प्रोत्साहन दिले असावे, असा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. परंतु अमोल शिंदे थोडक्यात पराभूत झाले व त्यानंतर ते पुन्हा भाजपमध्ये सक्रिय झाले. हा जो बंडखोरीचा प्रकार घडला होता, तो केवळ पाचोरा-भडगावपुरता मर्यादित नव्हता. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपाने असाच डाव खेळला होता.  बंडखोरी घडवून आणणे व एकहाती सत्ता मिळवणे पण उद्धव ठाकरे चतुर निघाले. त्यांनी भाजपाचा हा कटकारस्थानाचा खेळ ओळखला आणि काही ठिकाणी त्यांनीही बंडखोर उभे केले. यामुळे निवडणुकीनंतर भाजपला पूर्णपणे वर्चस्व गाजवता आले नाही. पंरतु आपल्या सोबत राहून आपलाच पक्ष संपवु पाहणाऱ्या पक्षाला उद्धध ठाकरेंनी नाकारले व विरोधकांसोबत जाऊन सत्तेवर आले. 

पण केंद्रातील ताकद, यंत्रणेची अदृश्य शक्ती आणि नंतर घडवून आणलेल्या फुटींच्या मालिकेमुळे भाजपाने शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट उभा केला, त्याला सत्तेत आणले. त्यानंतर अजित पवार गट वेगळा पडला आणि तोही सत्तेत सहभागी झाला. तीन पक्ष एकत्र आल्यामुळे अमोल शिंदेंना भाजपकडून तिकीट मिळणे कठीण झाले. मग त्यांनी 2024 ची निवडणुक पुन्हा अपक्ष म्हणून लढवली, पराभूत झाले. परंतु नंतर ते पुन्हा भाजपमध्ये सक्रिय झालेले आहेत.


याचा अर्थ भाजपाला खास करुन उत्तर महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना पाचोऱ्यात कमळ चिन्हावर निवडून आलेला आमदार हवा आहे. 


म्हणुनच काही प्रश्न सहज तयार होतात की,

या सगळ्या हालचालींमुळे हा मतदारसंघ भविष्यात युतीसाठी बाय ठरणार का ?

की एकनाथ शिंदे व अजित पवार यांना अचानक दुर करुन भाजपा स्व बळावर वाटचाल करेन ? त्यामुळेचं यत्रंणेची भिती दाखवुन नेत्यांची भरती प्रक्रिया अजुनही सुरुचं आहे ?

की विरोधकांतून कुणीतरी पुढे येऊन पाचोरा भडगाव मतदारसंघात नव्याने संघटन उभारेल ?

महत्वाचा प्रश्न म्हणजे युतीकडे सध्या तालुक्यात किशोर पाटीलं आमदार आहेतं. तरीही, तालुक्यातील मोठे नेते भाजपात का प्रवेश करत असतीलं ?

पाचोरा भडगाव पंचक्रोशितीलं लोकांना तर असचं वाटतं की, एकतर यत्रंणेची भीती नाहीतर भविष्यात युती तुटू शकते आणि संधी मिळु शकते या आशेवर....


बाकी आता मतदारसंघात विरोधक कुठे आहेत..?

आजच्या घडीला या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) किंवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व इतर पक्ष यांच्याकडे उभं राहिलेलं संघटन नाही. जे नेते होते ते थेट सत्ताधारी गोटात गेले. त्यामुळे आगामी काळात कोणत्याही निवडणुकीत विरोधकांकडे लढाई करण्याइतकी ताकद राहील का, हा प्रश्न मोठा आहे.




शिवसेना उ.बा.ठा. गटातील लोकांनी सह्या करुन पक्षातचं असल्याचं सांगितलं आहे.


तरीही थोडक्यात सांगायचं तर, पाचोरा-भडगाव मतदारसंघात विरोधी पक्ष पूर्णपणे संपुष्टात येण्याच्या मार्गावर दिसत आहेत. आता हा रिकामा राजकीय अवकाश कुणी भरून काढतो का, की भाजप - एकनाथ शिंदे युती एकहाती वर्चस्व गाजवते, 

हे आगामी निवडणुकांचं मोठं आकर्षण ठरणार आहे.

पण,

गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघातील राजकीय रंगमंचावर विरोधकांची उपस्थिती शून्याकडे झुकतेय, हे मात्र नाकारता येत नाही.


महाराष्ट्रात चालु असलेल्या या साऱ्या चित्राला नुकतेच रामदास फुटाणे सरांनी  काही ओळींमध्ये मांडलं आहे, ते अगदी सार्थक वाटतं 

शूर आम्ही आमदार आम्हाला..

फक्त ED ची भीती...

वित्त, पुत्र, आणि सत्तेसाठी...

कमळ घेतले हाती....


विलास...

panchkroshi news

varsade pra pa

टिप्पण्या