पाचोऱ्यात सिनेस्टाईलं चोरी. सेवानिवृत्त शिक्षकाचे २ लाख लाबंवले. घटना सीसीटीव्हीत कैद.

पाचोरा (ता. 26 ऑगस्ट) :

शेख खलील शेख नुरा (सेवानिवृत्त शिक्षक, रा. पाचोरा) यांच्यासोबत बनावट फीटचा बनाव करून चोरट्यांनी मोठी फसवणूक केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, शेख खलील शेख नुरा यांनी दि.25 सोमवार रोजी बँक ऑफ महाराष्ट्रमधुन चेक वटवून रोख रक्कम काढली. ती रक्कम त्यांनी गाडीच्या डिक्कीत ठेवली व घरी निघाले. घराच्या कंपाऊंड जवळ पोहोचताच त्यांच्या समोर एका मुलाने अचानक फीट आल्याचे नाटक केले. सर मदतीसाठी तत्काळ गाडीतून उतरले. मात्र त्यांनी गाडीची चावी काढली नाही.


या दरम्यान दोन चोरटे तिथे मदतीच्या बहान्याने येऊन उभे राहिले. त्यांनी सरांना "घरातून पाणी आणा" असे सांगून आत पाठवले. सर घरात जाताच एक चोरटा त्यांच्या मागे मागे त्यांच्या मोटारसायकल पर्यंत गेला आणि डिक्कीत ठेवलेली रोख रक्कम हातोहात उचलली. व तिघांनी मिळून क्षणात पळ काढला.


या प्रकाराची नोंद पाचोरा पोलिसात झाली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु आहे. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली असून चोरटे लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


 या घटनेमुळे "घराच्या दाराशीही चोरट्यांचे धाडस" या चर्चेला उधाण आले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


panchkroshi news


टिप्पण्या