वरसाडे प्र पा (पाचोरा) जल जीवन योजना मंजुर रक्कम 14800000 रु ( एक कोटी अठ्ठेचाळीस लाख ) 8800000 रु खर्च. पण ग्रामस्थांचा आरोप नियमानुसार काम झालेलं नाही.
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथे जलजीवन योजनेअंतर्गत “हर घर जल” प्रमाणपत्र मिळालं असलं तरी प्रत्यक्षात योजना अर्धवटच अंमलात आली असल्याचे निदर्शनास आलेले दिसते.
काम अजुनही सुरु असेलं पण यापुढे काम होणार की नाही याबाबत ग्रामस्थ संभ्रमात आहे.
कागदावरच्या अहवालानुसार गावातील प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी झाली व भितींवरील पाईपाचे नळ घट्ट बसवले असल्याचे नमूद आहे, मात्र वास्तवात फक्त जलाशयापासून गावाच्या पाण्याच्या टाकीपर्यंतच नवी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. पंरतु गावातील गल्ल्यांमध्ये अजूनही 10-15 वर्ष जुन्या व फुटलेल्या पाईपलाईनद्वारेच पाणीपुरवठा सुरू आहे. वार्ड क्र 3 मध्ये असलेली पाण्याची टाकी कधीही कोसळु शकते अशी अवस्था असल्याचे गावकरी म्हणतातं.
ग्रामस्थांच्या मते, ही नविन पाईपलाईन सुद्धा वारंवार निसटते, त्यामुळे अनेक वेळा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित होतो. काही वेळा तर पाण्यासाठी ग्रामस्थांना काही दिवसांची वाट पाहावी लागते. “सरकारकडून कागदावर योजना अतिशय चांगली राबवली गेली असे दाखवले जाते पण गावात नविन पाईपलाईन असुनही पाण्यासाठी अधुनमधुन संघर्ष करावा लागतो,” त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
गावकऱ्यांचा आरोप आहे की, “हर घर जल” योजनेतील ठरलेले निकष — घराघरात नळजोडणी, सुरक्षित पाणीपुरवठा, गुणवत्तेची तपासणी यांचा प्रत्यक्षात फक्त काही भागच पाळला गेला आहे. उर्वरित कामांकडे ग्रामपंचायत व संबंधित विभागांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे.
अंगणवाडी, जिल्हा परीषद शाळा , आरोग्यकेंद्र, ग्रामपंचायत इमारत इथे नळ जोडणी झाली आहे अस कागदावर लिहलंय. पण प्रत्यक्षात इथे जोडणी झालेली आढळलेली नाही.
ज्या कंपनीला किंवा ठेकेदाराला हे काम दिले होते. ते व्यवस्थित काम करत आहे का किंवा केलं आहे का ? यावर लक्ष ठेवण्याचे काम तत्कालीन सरपंच व सर्व सदस्याचे होते पंरतु त्यांनी दुर्लक्ष केलेले असावे. किंवा ठेकेदासोबत मिळुन ते भर्ष्टाचारात सहभागी असावेत असा आरोप गावातील नागरीकांनी केला आहे.
ग्रामस्थांनी तातडीने गल्ल्यांमधील जुनी पाईपलाईन बदलण्याची मागणी केली असून, नविन नळ कनेक्शन देण्याची मागणी केली आहे व पुरवठा खंडित होण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
विनोद चव्हाण या तरुणाने पंचक्रोशी न्युज सोबत बोलतांना सांगितले की, एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये ही रक्कम मोठी आहे. ती सगळी रक्कम शासनाने खर्च करावी पंरतु गल्यांमधील पाईप लाईन व नळ नविन बसवावेतं.
panchkroshi news
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा