वीर जवान अमर रहे!
जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र, भारतीय सैन्यात कर्तव्य बजावणारे भडगाव तालुक्यातील गुढे गावचे जवान स्वप्निल सोनवणे यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. संपुर्ण देश त्यांच्या या त्यागाचा व बलिदानाचा आजन्म ऋणी असेल. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भारतीय सैनिक हे केवळ सीमांचे रक्षक नसतात, तर ते आपल्या प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नांचे, स्वातंत्र्याचे आणि भविष्याचे प्रहरी असतात. ते थंडीत, उष्णतेत, पावसात, अथांग पर्वतांवर आणि रणभूमीवर दिवस-रात्र पहारा देतात. स्वतःच्या सुखसोयी, कुटुंब आणि आयुष्याचा त्याग करून ते मातृभूमीच्या रक्षणासाठी अखंड उभे असतात. त्यांचा त्याग, धैर्य आणि निष्ठा हीच खरी देशभक्तीची मूर्ती आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🇮🇳🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा