"आपण एकटे पालक आहात का?"
मुलांचे संगोपन करण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी तुम्ही एकटेच जीव तोडून मेहनत करत आहात का?
तुमच्या कष्टांना सरकारचा आधार देण्यासाठी…
ही योजना खास तुमच्यासाठी आहे!
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना
महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन
दरमहा ₹2000 आर्थिक मदत थेट तुमच्या बँक खात्यात!
🎯 कोण पात्र आहे?
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
🔸 एकटे पालक – पती/पत्नीचा मृत्यू, घटस्फोट, विभक्त
🔸 विधवा महिला
🔸 दिव्यांग पालक / दिव्यांग मुलांचे पालक
🔸 मुलं 0 ते 18 वयोगटात आणि शाळेत शिक्षण घेत असलेली असावीत
🔸 पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे
🧾 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रं:
✅ शाळेतील बोनाफाईड प्रमाणपत्र
✅ आई / वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र / विभक्त प्रमाणपत्र
✅ लाभार्थी / पालकाचा आधारकार्ड
✅ उत्पन्नाचा दाखला
✅ जन्माचा दाखला
✅ बँक पासबुक झेरॉक्स
✅ पासपोर्ट आकाराचा फोटो
✅ रहिवासी दाखला
📌 कुठे करायचा अर्ज?
आपल्या आंगणवाडी सेविकेशी, CDPO कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधा.
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या:
🔗 https://womenchild.maharashtra.gov.in
🎉 आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारचा हातभार –
लवकर अर्ज करा आणि लाभ घ्या!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा