दि.20 आँगस्ट 2025.
सोयगावहून पिंपळगाव हरेश्वर - पाचोरा मार्गे धुळ्याकडे जाणारी सोयगाव डेपोची एसटी बस क्र. MH-14-BT-1984 आणि खासगी आयसर टेम्पो क्र. MH-19-CY-1606 यांची जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत बसमधील एक जण मृत्युमुखी तर अनेक प्रवासी जखमी झाले.
अपघातात पंकज पाटील वय ३०, उंदीरखेडा यांचा मृत्यू झाला असून जखमींना रुग्णांना तातडीने पारोळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
1. मिराबाई पंढरी सोनवणे (५५, सोयगाव)
2. निलाबाई घनश्याम सिरसागर (७५, धुळे)
3. अंजनाबाई रघुनाथ पाटील (७०, हनुमंतखेडा)
4. मनोहर सज्जन पाटील (६०, चोरवड)
5. रमेशा धोंडू चौधरी (८०, भडगाव)
6. मीराबाई रघुनाथ पाटील (८०, धुळे)
7. जानवी संतोष मोरे (१९, धुळे)
8. रघुनाथ गणपंत सोनवणे (ठेकु)
अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती.
गावातील काही तरुणांनी प्रवाशांना हाँस्पीटलला घेऊन जाण्यास मदत केली आणि घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णांना उपचारासाठी हलविले.
panchkroshi news
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा