वरसाडे प्र पा गावात दरवर्षी प्रमाणे तीन ठिकाणी फडकला तिंरगा. ग्रामपंचायत , जि. प. शाळा , आश्रम शाळा. ७९ व्या स्वातंत्र दिनाचे काही खास क्षण तुमच्यासाठी..
वरसाडे दि. 15 आँगस्ट 2025 :
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी वरसाडे गाव देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले. गावातुन शालेय विद्यार्थ्यांनी मिरवणुक काढल्यानंतर दरवर्षीप्रमाणे गावात तीन ठिकाणी अभिमानाने तिंरगा फडकला.
सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावाच्या प्रथम नागरीक सौ.सुरेखा पवन पवार सरपंचं यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण झाले. याप्रसंगी उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, व सर्व स्तरातील ग्रामस्थ उपस्थित होते. गावकऱ्यांनी एकत्र येऊन देशाच्या एकतेचा आणि प्रगतीचा संकल्प केला.
यानंतर जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ. शितल राजाराम राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. तिरंग्याला सलामी देत मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, शिक्षक, पालक, आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. शाळेच्या वतीने मुलांना व कार्यक्रमाला उपस्थित सगळ्यांना तबांखुमक्तीची शपथ देण्यात आली.
श्रीमती कसळाबाई शंकर पवार प्राथमिक , माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षक , विद्यार्थ्यांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ध्वज फडकवण्यात आला. देशभक्तीपर गाणी, कविता, कवायत आणि लहान मुलांच्या जोशपूर्ण घोषणा यामुळे दरवर्षी प्रमाणे वातावरण भारावून गेले.
स्वातंत्र दिनानिमित्त गावातील नागरीकांनी व माजी विद्यार्थ्यांनी जिल्हा परीषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
आज स्वातंत्र दिनाच्या मिरवणुकीनंतर गावभर ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा घुमत होत्या.
कार्यक्रमानंतर ग्रामपंचायतच्या संपुर्ण टीमने प्राथमिक आरोग्य केंद्राभोवती वृषारोपन केले. वृषारोपन करतांना सरपंच सौ सुरेखा पवार व पती श्री पवन पवार उपस्थित उपसरपंच श्री विनायक राठोड , पोलीस पाटील श्री.राजाराम राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष प्रविण , ग्रामपंचायत सदस्य श्री गोकुळ राठोड, श्री बाबुलाल चव्हाण, श्री प्रकाश जाधव , श्री अमोल राठोड , अगंणवाडी सेविका, आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरते शेवटी हलक्या पाऊस झाल्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.







टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा