वरसाडे प्र पा तांडा (पाचोरा) येथे आमदार किशोर पाटील यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी औषध फवारणी पंप वाटप...
वरसाडे (ता. पाचोरा, जि. जळगाव), दि. 20 ऑगस्ट 2025 : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुढाकाराने वरसाडे प्र पा तांडा येथे वसंतराव नाईक चौकात शेतकऱ्यांसाठी अनुदानित दरात औषध फवारणी पंप वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत बाजारमूल्य ₹2,500 असलेला शेती उपयुक्त फवारणी पंप केवळ ₹1,500 मध्ये शेतकऱ्यांना देण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात शेतीसाठी आवश्यक साधन उपलब्ध झाले असून शेती उत्पादकतेत वाढ करण्यास निश्चितच मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला तांडा क्र. ३ चे नाईक श्री. रंगलाल राठोड, ग्रामपंचायत सदस्य डॉ. नितीन चव्हाण, श्री. ज्ञानेश्वर (नानु) चव्हाण, श्री. लखिचंद पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली व त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फवारणी पंप वाटप केले गेले.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी हा उपक्रम सुरु करतांनाच सांगितल आहे की, “शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम पुढेही राबवले जातील.”
तसेच,
वरसाडे गावातील ज्या शेतकऱ्यांना अजूनही फवारणी पंप हवे असतील त्यांनी डॉ. नितीन चव्हाण व ज्ञानेश्वर (नानु) चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास श्री. दशरथ चव्हाण, श्री. आनंद राठोड, श्री. जयेश राठोड, श्री. हेमंत जाधव, श्री. कन्हीराम पवार, श्री. गोकुळ पवार, श्री. धनराज पवार, श्री. भाईदास राठोड, श्री. पोपट राठोड, श्री. विनोद चव्हाण, श्री. भगवान बडगुजर, श्री. वाल्मिक बडगुजर यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात आधुनिक शेती साधन उपलब्ध झाल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
panchkroshi news
Ad :
For industrial Calibration & Validation
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा