जळगाव जिल्ह्यात बैल पोळा साधेपणाने साजरा करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश; लंपी रोगापासून काळजी घेण्याचे आवाहन. दिरगांई केल्यास कारवाईचा इशारा..
जळगाव : जिल्ह्यातील काही भागात लंपी आजाराची प्रकरणे आढळल्याने यंदाचा बैल पोळा सण (२०२५-२६) साधेपणाने साजरा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिले आहेत.
प्राण्यांमधील संसर्गजन्य व सांधणिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम-२००९ अन्वये हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात ३२ व ३३ क्रमांकाच्या गोवंश व शेळीत लंपी आजाराच्या नोंदी झाल्याने, बैल पोळा सणातील पारंपरिक गर्दीमुळे संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा बैलांच्या मिरवणुका, शर्यती व सामूहिक कार्यक्रमांना परवानगी नसून, सण घरगुती स्तरावर साधेपणाने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ. आयुष प्रसाद यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व विभागीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामपंचायतींनी याची काटेकोर अंमलबजावणी करावी. पोलिस विभाग, महसूल विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनाही आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणी दिरंगाई केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे.
🐂 लंपी रोगापासून जनावरांचे संरक्षण :
जनावरांची नियमित तपासणी करावी.
आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.
गोठा व परिसर स्वच्छ ठेवून स्वच्छ पाणी द्यावे.
डास, गोचीड, माशांपासून संरक्षणासाठी फवारणी करावी.
शासनामार्फत लसीकरण करून घ्यावे.
बाजारात जनावरांची हालचाल टाळावी.
लक्षणे दिसताच त्वरित पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा.
यंदाचा बैल पोळा सण पारंपरिक उत्साहाने पण गर्दी टाळून साधेपणाने साजरा करावा, तसेच लंपी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
panchkroshi news
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा