पंचक्रोशी न्यूज — आपल्या गावाचा आवाज!
मी विलास नवले. माझ्या कंपनीच्या कामामुळे मी नेहमी व्यस्त असतो आणि कामानिमित्ताने अनेकदा गावाबाहेरही असतो. मात्र उर्वरित वेळ मी गावात घालवतो.
आजचं युग डिजीटल झालं आहे, आणि याच माध्यमातून गावासाठी व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी काहीतरी चांगलं करावं या उद्देशाने मी "पंचक्रोशी न्यूज" हे डिजिटल माध्यम सुरू करत आहे.

माझं मुख्य उद्दिष्ट म्हणजे —
पाचोरा तालुका, सोयगाव तालुका विशेषतः वरसाडे तांडा व पिंपळगाव हरेश्वर पंचक्रोशीतील सर्व गावातीलं नागरिकांपर्यंत स्थानिक घडामोडींसह शासन योजना, शेती, नोकरी, शिक्षण, राजकारण व जनहिताच्या बातम्या आणि माहिती तात्काळ पोहोचवणं.
मी पूर्णवेळ पत्रकार नसणार तरीही, माझ्या कामातून शक्य तितका वेळ काढून हे डिजिटल माध्यम चालवणार आहे.
हे माध्यम तुमच्या उपयोगाचं ठरेल यासाठी मी व पंचक्रोशी न्युज सर्वतोपरी प्रयत्न करेन.
तुमचा सहभाग आणि पाठिंबा हेच माझं खऱ्या अर्थाने बलस्थान असेल.
🗣️ तुमच्याकडे काही बातमी असेल, एखादी घटना, गैरव्यवहार किंवा शासकीय कार्यालयातील दुर्लक्ष जाणवत असेल, तर ती कृपया पंचक्रोशी न्यूजला मेसेजद्वारे कळवा.
पंचक्रोशी न्यूज अशा बातम्यांची योग्य दखल घेईल आणि न्याय मिळवून देण्यासाठी शक्य तितका प्रयत्न करेल.
📲 आपल्या गावातील व पंचक्रोशीतील बातम्या मोबाईलवर तत्काळ मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया पेजला Follow करा:
🔗 Facebook: https://www.facebook.com/share/1E5b2YiivL/?mibextid=qi2Omg
🔗 Instagram: https://www.instagram.com/panchkroshinews/profilecard/?igsh=MjJjNnBjdnVuOHFl
"पंचक्रोशी न्यूज –
बातमी तुमच्यासाठी… तुमच्या न्यायहक्कासाठी!"
– विलास नवले
संपादक – पंचक्रोशी न्यूज