रोजगार हमी योजना (MGNREGA) –
🏛️ योजनेचा इतिहास – सुरुवातीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत
✅ सुरुवात महाराष्ट्रातून (1972)
1972 मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यामुळे हजारो शेतकरी, कामगार बेरोजगार झाले.
त्यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी ‘महाराष्ट्र रोजगार हमी योजना’ सुरू केली.
यामध्ये सरकारने गावकऱ्यांना कामाची हमी दिली.
👉 भारतात ही पहिली रोजगार हमी योजना ठरली
✅ तेव्हा काम कसं चालायचं?
📌 कामाची मागणी
गावात काम हवं असेल तर ग्रामसेवक/सरपंचाकडे तोंडी सांगावं लागायचं.
काही ठिकाणी सामूहिक अर्ज (एकाच कागदावर अनेक नावे) दिली जात.
📌 काम कोणतं मिळायचं?
तलाव खोदाई, रस्त्यांची डागडुजी, शेततळे, वृक्षारोपण, बंधारे अशा शारीरिक कामांची योजना असायची.
📌 हजेरी कशी घ्यायची?
हजेरी वहीत नाव, तारीख, तास यांची नोंद व्हायची.
सुपरवायझर किंवा ग्रामसेवक सही करून ती नोंद शासनाकडे पाठवायचा.
📌 पगार कसा मिळायचा?
काम झाल्यानंतर हजेरीनुसार रोख स्वरूपात मजुरी दिली जायची.
काही भागात पोस्ट ऑफिसमार्फत पगार मिळायचा.
पैसे मिळायला कधी कधी १५-२० दिवस लागू शकायचे.
राष्ट्रीय विस्तार (2005 - 2009)
महाराष्ट्रातील यशस्वी प्रयोग पाहून 2005 मध्ये केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (NREGA)’ सुरू केली.
2009 मध्ये योजनेला महात्मा गांधी यांचं नाव देऊन "MGNREGA" असं नामकरण केलं.
🛠️ 2025 मध्ये चालू असलेली प्रक्रिया –
🧾 १. जॉब कार्ड काढणे
प्रत्येक कुटुंबातील 18 वर्षांवरील व्यक्ती ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करून जॉब कार्ड काढू शकते.
लागणारी कागदपत्रे:
आधार कार्ड
फोटो
ओळखपत्र (मतदार कार्ड/राशन कार्ड)
15 दिवसांत जॉब कार्ड मिळते.
आता गावात रोजगारसेवक असतो. त्याच्यामाध्यमातुन ही कामे होतात.
✋ २. कामाची मागणी करणे
जॉब कार्ड मिळाल्यानंतर ग्रामसेवकाकडे लिखित मागणी करावी लागते.
अनेक माणसे एकत्र जमुन कामाची मागणी करु शकतात.
ग्रामसेवक कामाची नोंद करतो.
📝 ३. कामाची योजना तयार होणे
मागणी एकत्र करून ग्रामपंचायत पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवते.
मंजुरी मिळाल्यावर कामाचे आदेश येतात.
🧱 ४. स्थानिक काम दिले जाते
नाला खोदाई, बंधारे, शेततळे, वृक्षारोपण, मातीचे काम, रस्त्यांची काम देखभाल, बांधकाम अशी कामं गावातच दिली जातात.
काम 5 कि.मी.च्या आत असावं लागतं.
📸 ५. डिजिटल हजेरी (NMMS App)
आता मॉर्निंग आणि संध्याकाळी मोबाईल अॅपवर फोटोसह हजेरी घेतली जाते.
हे फोटो थेट सरकारच्या पोर्टलवर अपलोड होतात.
( नेटवर्क मुळे काही ठिकाणी अपवाद असतात. )
💰 ६. थेट बँक खात्यात पगार
हजेरीनुसार सरकार थेट मजुराच्या बँक खात्यात पैसे पाठवते.
2025 मध्ये दररोजची मजुरी ₹285 (राज्यानुसार बदलू शकते).
पगार 7-15 दिवसांत जमा होतो.
📲 ७. कामाच्या तपशीलासाठी वेबसाइट
https://nrega.nic.in वर जाऊन काम, हजेरी, पगार तपासू शकता.
📢 महत्वाचे लक्षात घ्या:
गावात / तुमच्याकडे जॉब कार्ड आहे, काम मागितलं पण मिळालं नाही?
तर आता तुमचा सरकारकडे "बेरोजगारी भत्ता" घेण्याचा हक्क आहे!
📌 काय आहे 'बेरोजगारी भत्ता'?
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA),
जर एखाद्या व्यक्तीने लिखितरित्या कामाची मागणी केली आणि 15 दिवसांच्या आत काम उपलब्ध करून न दिल्यास, त्या व्यक्तीस "बेरोजगारी भत्ता" मिळण्याची तरतूद आहे
👩🌾 कोण पात्र आहे?
बेरोजगारी भत्ता मिळण्यासाठी खालील अटी लागू होतात:
1. अर्जदाराकडे वैध जॉब कार्ड असले पाहिजे.
2. ग्रामसेवकाकडे किंवा ग्रामपंचायतीत "लिखित स्वरूपात" कामाची मागणी केलेली असावी.
3. सरकार 15 दिवसांच्या आत काम देण्यात अपयशी ठरली असेल.
4. कामासाठी तयार असूनही काम न मिळालेल्या व्यक्तीला भत्ता मिळतो.
💸 भत्ता किती मिळतो?
पहिल्या 30 दिवसांसाठी: दैनंदिन मजुरीच्या किमान 1/4 भाग (२५%)
31 व्या दिवसानंतर: मजुरीच्या १/२ भाग (५०%)
हे दर राज्यानुसार थोडेफार बदलू शकतात.
👉 उदाहरण:
जर तुम्हाला प्रतिदिन ₹280 मजुरी मिळाली असती,
तर भत्ता: ₹70 ते ₹140 दरम्यान (शासनाच्या नियमानुसार) मिळू शकतो.
📋 भत्ता कसा मागायचा?
1. लिखित मागणीची नोंद ठेवा – ग्रामसेवक/सरपंचाकडे दिलेला अर्जाची प्रत.
2. 15 दिवसांनंतर काम मिळालं नसेल तर पंचायत कार्यालयात तक्रार द्या.
3. तालुका पंचायत समितीकडे लेखी अर्ज करा, ज्यामध्ये मागणीची तारीख व जॉब कार्ड नंबर नमूद करा.
4. भत्ता मंजूर झाल्यानंतर थेट बँक खात्यावर जमा केला जातो
🔍 भत्त्याची माहिती कुठे मिळेल?
https://nrega.nic.in या वेबसाइटवर
Job Card नंबर टाका → मागणी व कामाच्या स्थितीची माहिती मिळेल.
तिथून तुम्ही भत्ता देयकाची स्थितीही पाहू शकता.
❗ अनेक जणांना माहितीच नसते!
> "काम न मिळाल्यास काही मिळत नाही" असे समजून अनेक लोक गप्प बसतात.
पण वास्तविकता ही आहे की, काम मागून मिळालं नाही, तर सरकारने भत्ता देणं कायदेशीर बंधनकारक आहे.
📢 'पंचक्रोशी आवाहन:
जे हक्क तुम्हाला मिळाले आहेत, ते मागा.
रोजगार हमी योजना म्हणजे फक्त मजुरीच नव्हे, तर मान-सन्मानाचा अधिकारही आहे.
फोटो स्त्रोत: AI निर्मित
> "ही योजना भीक नाही, तुमचा हक्क आहे!"
"काम मागा, काम मिळवा, अधिकार मिळवा!"
panchkroshi news
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा