राज-उद्धव एकत्र... राजकीय वादळाचे संकेत ! राजकडून ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा स्पष्टपणे उल्लेख..

 राज ठाकरे यांनी ‘माझे बंधु’  फक्त असा उल्लेख  केलेला नाही, तर शिवसेना फुटलेली आहे, पक्षाचे नाव व चिन्ह दुसऱ्या गटाला दिले गेले आहे हे माहिती असतानाही…


तसंच, पक्ष व चिन्हाचा अंतिम निर्णय अजूनही सर्वोच्च न्यायालयाकडून आलेला नाही, हे माहिती असूनही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा स्पष्टपणे केला आहे.




आज तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे मातोश्री येथे गेले होते, आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीचंही दर्शन घेतलं.


याचा स्पष्ट अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात, दोन्ही बंधु शिवसेनेला आणि विशेषतः मराठी माणसाला, मुंबई शहराला आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देण्यासाठी एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत.


आता प्रतिक्षा आहे फक्त निवडणुकीच्या घोषणांची…

आता प्रतिक्षा आहे राज ठाकरे यांच्या राजकीय भाषणाची…

टिप्पण्या