गुन्हा तर घडतो, पण तपास यत्रंणेने पकडलेले आरोपी निर्दोष सुटतात.

गुन्हा घडतो, पण तपास यत्रंणेने पकडलेले आरोपी निर्दोष सुटतात.  दोष कोणाचा ? तपास यत्रंणेला कोणीच जाब का विचारतं नाही ? 

✍️ पंचक्रोशी न्युज विशेष लेख

मालेगाव, 2008. सायंकाळी स्फोट होतो. देशभरातील न्युज चँनेलवर  बातम्या चालतात. 6 निष्पाप लोकांचा मृत्यू होतो. शेकडो जखमी होतात. टीका टिप्पणी व्हायला लागते. तपास सुरु होतो, आरोपी अटक होतात.. आणि आज १७ वर्षांनी निकाल लागतो की, सर्व आरोपी निर्दोष!



मग गुन्हा केला कोणी ?

तपास यत्रंणा पधंरा-वीस वर्ष काय करतातं ?

लोकांना फक्त आरोपामुंळे वीस-वीस वर्ष जेलमध्ये राहावं लागतं असेलं तर हा कोणता न्याय आहे ?

या प्रश्नांच काय ? कोण उत्तर देणार ?


आजचा निकाल म्हणजे केवळ मालेगाव स्फोटच नव्हे तर भारतातील संपूर्ण गुन्हे अन्वेषण प्रणालीवर गंभीर प्रश्न निर्माण करणारा क्षण आहे. गुन्हा घडतो, पण गुन्हेगार सापडत नाही. असं वारंवार होत असेल तर ते केवळ एका प्रकरणाची चूक नाही ती संपूर्ण व्यवस्थेची झोपलेली जाणीव आहे..


🔍 मालेगावप्रमाणेच अन्य प्रकरणे जिथे आरोपी निर्दोष ठरले:

1. मक्का मशीद स्फोट (हैदराबाद, 2007)

स्फोटात 9 ठार, 50 पेक्षा जास्त जखमी...

10 वर्षांच्या सुनावणीनंतर 2018 मध्ये सर्व आरोपी निर्दोष...

NIA साक्ष सिद्ध करण्यात अपयशी...


2. समझौता एक्सप्रेस स्फोट (2007)

68 लोक मृत्युमुखी...

NIA ने हिंदू अतिरेकी गटावर आरोप केले...

2019 मध्ये कोर्टाने पुराव्याअभावी सर्व आरोपींची मुक्तता केली....


3. अजमेर दरगाह स्फोट (2007)

3 ठार, 15 जखमी

2017 मध्ये दोघांना शिक्षा, पण प्रज्ञा ठाकूरसारख्या प्रमुख आरोपींची निर्दोष मुक्तता....


4.  बेस्ट बस बॉम्बस्फोट, मुंबई  (2002-2003)

अनेक ठार, 100+ जखमी

आरोप ठेवलेले अनेक मुस्लिम तरुण पुढे निर्दोष सुटले, 10-12 वर्षे तुरुंगात काढून....


ही फक्त तपासातील चूक आहे की हेतुपुरस्सर दुर्लक्ष?

या सगळ्या घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे तपास यंत्रणांकडून पुराव्यांची योग्य नोंद नाही, जबाब फितूर होणे, फॉरेंसिक चूक, तपासात राजकीय हस्तक्षेप आणि बऱ्याचदा “कोणतंही चेहरा दाखवण्यासाठी” काही व्यक्तींना आरोपी बनवणे.

काही वेळा तपास चुकीच्या दिशेने जातो,

कधी हेतुपुरस्सर चालतो,

तर कधी यंत्रणा दुर्बळ असते.

⚖️ चुकीच्या व्यक्तीला शिक्षा नको, पण... जर अशा प्रकरणात शिक्षेस पात्र व्यक्तीच न्यायाच्या कक्षेबाहेर राहिला किंवा पुराव्या अभावी शिक्षा झालीचं नाही तर लोकशाहीतला सर्वात मोठा विश्वास म्हणजे “गुन्ह्याला शिक्षा”  तोच खंडित होतो.


यंत्रणेच्या अशा अपयशामुळे फक्त आरोपी नव्हे, तर संपूर्ण देश, मृतांचे कुटुंब, आणि न्यायावर विश्वास ठेवणारी जनता सगळे हरलेले असतात.


तपास करण्यासाठी तंत्रनज्ञान असतांनाही असचं सुरु राहीलं तर यापुढेही "गुन्हे घडतील... पण गुन्हेगार कोण?" हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहील.


टिप्पण्या